प्रसिद्ध मंदिरात पुजाऱ्यांच्या जागांसाठी मेगा भरती, 90 हजार रुपये मानधन सुद्धा मिळणार!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kashi vishwanath | देशामध्ये रोजगारासाठी युवक, कष्टकरी नोकरदार वर्ग पोलीस भरती, शिक्षक भरती, सरकारी नोकरीसंबंधीत भरतीसाठी अर्ज करतात. अशा भरतींबाबत आपल्याला कल्पना असेलच मात्र प्रसिद्ध मंदिरात पुजाऱ्यांच्या जागांसाठी मेगा भरती आयोजित केलेलं आतापर्यंत कधीच ऐकलं नसेल ना? पण हे खरं आहे. आता काशी-विश्वनाथ (Kashi vishwanath) सारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये रोजगार निर्माण होणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिरात रोजगाराच्या संधी

आयोध्येतील राम मंदिरामध्ये एका पुजाऱ्याची निवड केली होती. आता देखील काशी विश्वनाथसारख्या मंदिरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी मुख्य पुजारी, कनिष्ठ पुजारी आणि सहायक पुजारी अशा पदांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी आकर्षक मानधन देखील देण्यात येणार आहे.

आकर्षक मानधन 

काशी विश्वनाथसारख्या धाममध्ये तीन पुजाऱ्यांच्या पदासाठी नियुक्ती करण्यात आली. त्या पदाप्रमाणे मासिक मानधनही आकर्षक आहे. मुख्य पुजारी पदासाठी मासिक मानधन हे 90 हजार रूपये आहे. तर कनिष्ठ पदासाठी 80 हजार रूपये मानधन आहे आणि तिसऱ्या म्हणजेच सहायक पुजाऱ्यासाठी 65 हजार रूपये मानधन आहे. एकूण 50 पुजाऱ्यांसाठी हा रोजगार असणार आहे.

जाहिरात प्रसिद्ध

काशी विश्वनाथसारख्या धाममध्ये पुजाऱ्यांच्या रोजगारासाठी नियुक्ती करण्याबाबत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी एकूण 50 पुजाऱ्यांसाठी संधी असणार आहे. 105 व्या न्यासच्या बैठकीमध्ये 41 वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये संस्कृत भाषेमध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी फायदा आहे. न्यासकडून पुस्तकं आणि ड्रेस देण्यात येणार आहे.

न्यासच्या झालेली 105 वी बैठक ही नागेंद्र पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली. या बैठकीची सुरूवात ही वेंकट रमन घनपाठी यांच्याकडून वैदिक मंत्रांद्वारे करण्यात आली आहे. यामध्ये 4 दशकानंतर पुजाऱ्यांच्या नियुक्तीबाबत घोषणा करण्यात आली आहे.

संस्कृत ज्ञान स्पर्धेचं आयोजन

यामध्ये संस्कृत विद्यार्थ्यांसाठी न्यासकडून संस्कृत ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संस्कृत शिकणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी संधी आहे. संपूर्णानंद संस्कृत विद्यालयामध्ये अनुदानही दिलं जाणार आहे.

News Title – kashi vishwanath poojari vacancy

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी समोर!

‘एक दिवस जायचा टपकून वर, त्याचं वय झालंय’; जरांगेंनी भुजबळांना सुनावलं

खुशखबर! सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

“महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी…”

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!