“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhishek Ghosalkar | मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्ह सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणा संबंधी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मॉरिसचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो पोस्ट केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

ही घटना घडल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी मॉरिसचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरचा फोटो पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यात मुख्यमंत्री शिंदे आणि मॉरिस समोरासमोर उभे राहून एकमेकांना नमस्कार करताना दिसत आहेत.

वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय!

महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मॉरिस याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले. (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय) आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला. फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी ठरले आहेत. त्यांनी आता राजीनामा द्यावा, अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.

या पोस्टसोबतच संजय राऊत यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. यापूर्वीही त्यांनी घोसाळकर यांच्यावर उपचार सुरू असतानाही एक ट्वीट केलं होतं. “महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात. गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करत फिरत आहेत”, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.

मॉरिस आणि अभिषेक यांच्यामध्ये अंतर्गत वाद

दारमीन, मॉरिस आणि अभिषेक (Abhishek Ghosalkar) यांच्यामध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद होते. ते मिटवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेकचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवली होती. यानंतर गुरुवारी सकाळी (8 फेब्रुवारी) मॉरिसने अभिषेक यांना फोन लावून संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम असल्याचं सांगून बोलवलं. या कार्यक्रमापुर्वी मॉरिसने अभिषेकला फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेलं आणि इथेच त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यापूर्वी भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा हा प्रकार घडला. यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न केले जात आहेत.

News Title-  Sanjay Raut posted a photo of Abhishek Ghosalkar with Eknath Shinde 

महत्त्वाच्या बातम्या –

“तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा…”, पत्नीचा धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध मंदिरात पुजाऱ्यांच्या जागांसाठी मेगा भरती, 90 हजार रुपये मानधन सुद्धा मिळणार!

आधी जवळीकता वाढवली नंतर…; अभिषेक घोसाळकरांना मारण्याचं आधीच झालेलं प्लॅनिंग

तुमच्या प्रिय व्यक्तीला चॉकलेटसोबतच द्या ‘या’ गोड शुभेच्छा; नात्यात वाढेल गोडवा

पुणेकरांनो घराबाहेर पडणार असाल तर ‘ही’ बातमी वाचा!