मुंबई | टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. जडेच्या घरात सध्या कौटुंबिक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. (Ravindra Jadeja) जडेजाचे वडिल अनिरुद्ध सिंग यांनी या मुलाखतीत मुलगा रवींद्र जडेजा आणि सून रिवाबा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सून रिवाबावर कुटुंब उद्ध्वस्त केल्याचा आरोपही केला.
रविंद्रवर वडिलांचे आरोप
दिव्य भास्करशी संवाद साधताना रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja) वडील अनिरुद्ध सिंग म्हणाले, माझा रवी किंवा त्याची पत्नी यांच्याशी काहीही संबंध नाही. मी त्याच्याशी बोलत नाही आणि तो मला फोनही करत नाही. मी करतो. रवींद्रच्या लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनी वाद झाला. मी जामनगरला एकटाच राहतो तर रवींद्रचा पंचवटीत वेगळा बंगला आहे, असं रविंद्रच्या वडिलांनी सांगितलं आहे.
रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं, असं वक्तव्य रविंद्रचे वडिल अनिरूद्ध सिंह यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या आरोपाने खळबळ माजलीये. त्यांनी कुटुंबातील वादाला रविंद्र जडेजाची बायको रिबाबा जडेजाला कारणीभूत ठरवलं आहे.
अनिरुद्ध सिंग जडेजाही म्हणाले की “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही रवींद्रच्या मुलीचा चेहराही पाहिला नाही. रवीची सासू सर्व काही सांभाळते. तिचा हस्तक्षेप खूप आहे.”
ते पुढे म्हणाले, “माझ्याकडे गावात जमीन आहे आणि मला 20,000 रुपये पेन्शन मिळते. यातून माझा खर्च भागतो. मी टू बीएचके फ्लॅटमध्ये एकटा राहतो. मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगतो.” आजही अनिरुद्ध सिंग यांनी या फ्लॅटमध्ये त्यांचा मुलगा रवींद्रची खोली सुंदरपणे सजवली आहे.
Ravindra Jadeja | रविंद्र जडेजाचं वडिलांना उत्तर
वडिलांच्या आरोपांनंतर रविंद्रने एक पेस्ट केली आहे. यांनी त्यांनी हे सगळं खोटं असल्याचं म्हटलंय. माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करू नका. दिव्य भास्करला दिलेल्या अविश्वसनीय मुलाखतीत केलेली वक्तव्ये निरर्थक आणि साफ खोटी आहेत. ती सगळी एकतर्फी वक्तव्ये आहेत. मी त्या वक्तव्यांचं खंडण करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सगळा प्रकार अयोग्य आणि निंदनीय आहे. मी याबद्दल खूप काही बोलू शकतो. परंतु, मला सार्वजनिकरित्या काहीही बोलायचं नाही. मी सार्वजनिकपणे न बोलणं जास्य उचित ठरेल, असं रवींद्र जडेजाने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ
बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात
“तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा…”, पत्नीचा धक्कादायक खुलासा
प्रसिद्ध मंदिरात पुजाऱ्यांच्या जागांसाठी मेगा भरती, 90 हजार रुपये मानधन सुद्धा मिळणार!
आधी जवळीकता वाढवली नंतर…; अभिषेक घोसाळकरांना मारण्याचं आधीच झालेलं प्लॅनिंग