“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhishek Ghosalkar Murder | राज्यामध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढू लागली आहे. काही दिवसांआधी गणपत गायकवाड प्रकरणानं खळबळ माजलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Murder) यांच्यावर 8 जानेवारीला दहिसर येथील माॅरिस नामक व्यक्तीनं गोळ्या घालून हत्या केली आहे. यामुळे आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

माॅरिस आणि नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित फोटो आहेत. अनेक वर्षांपासून ते एकत्रित आहेत, आता नेमकं कशावरून बेबनाव झालं हे पाहणं गरजेचं आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू असून पोलीस यामधून एक एक नवीन माहिती समोर येत आहे. योग्य वेळी ती माहिती तुम्हाला दिली जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. याप्रकरणाशी कोणतंही राजकारण करणं योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

वैमनस्यातून हत्या Abhishek Ghosalkar Murder

घडलेल्या प्रकरणावर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून होताना दिसत आहे. मात्र ही हत्या वैमनस्यातून झाली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

सध्या राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एका महिन्याआधी पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा येथे शरद मोहोळवर गोळीबार झाला. त्यानंतर काही दिवसांआधी कल्याणमधील गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश जाधव यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर आता अभिषेक घोसाळकर प्रकरणामुळे राज्याचं वातावरण हे दुषित होऊ लागलं आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये शस्त्र वापरणाऱ्यांबाबत बैठक घेतली आणि यावर निर्णय घेतला जाणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

सध्या सुरू असलेल्या गुन्हेगारांना शस्त्र बागळण्यासाठी परवाना दिला जातो. मात्र या शस्त्राचा योग्य वापर केला जात नाही. या भेटलेल्या परवान्यामुळे बंदुकीचे परवानाधारक कायदा हातामध्ये घेताना दिसत आहेत. यामुळे आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये बंदुक परवाना देण्याआधी काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत माहिती देण्यात आली आहे.

विरोधकांवर फडणवीसांचा पलटवार

विरोधक सध्या घडलेल्या प्रकरणावरून राजीनामा मागत आहेत, असा प्रश्न फडणवीस यांना माध्यमांनी विचारला असता यावर आता फडणवीस यांनी टीका केली आहे. उद्या माझ्या गाडीखाली जरी श्वान आलं तरीही ते मला राजीनामा मागायला लावतील. अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही वैमनस्यातून झाली आहे. याप्रकरणावर त्यांनी मला राजीनामा मागणं यात मला काही आश्चर्य वाटणार नाही.

News Title – Abhishek Ghosalkar murder on Devendra Fadanvis statement

महत्त्वाच्या बातम्या

आधी जवळीकता वाढवली नंतर…; अभिषेक घोसाळकरांना मारण्याचं आधीच झालेलं प्लॅनिंग

तुमच्या प्रिय व्यक्तीला चॉकलेटसोबतच द्या ‘या’ गोड शुभेच्छा; नात्यात वाढेल गोडवा

पुणेकरांनो घराबाहेर पडणार असाल तर ‘ही’ बातमी वाचा!

राज्यातील शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी समोर!

‘एक दिवस जायचा टपकून वर, त्याचं वय झालंय’; जरांगेंनी भुजबळांना सुनावलं