संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar vs Santosh Bangar | राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच राज्यात सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांमध्ये आचारसंहिता देखील लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार, खासदार तसेच सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपल्या विभागामध्ये जात सामान्य नागरिकांची भेट घेत आश्वासनं देताना दिसत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे त्याच्या मतदारसंघातील शाळेमध्ये गेले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना एक धक्कादायक वक्तव्य केल्यानं सर्व राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. (Rohit Pawar vs Santosh Bangar)

काय म्हणाले संतोष बांगर?-

आमदार संतोष बांगर हे शाळेत विद्यार्थ्यांकडे गेले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी संवाद साधत असताना एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानं राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. ‘मी आमदार होण्यासाठी मुलांनी दोन दिवस उपाशी राहा”, असं धक्कादायक आवाहन त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केलं आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar vs Santosh Bangar) संतोष बांगरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संतोष बांगरवर कारवाई करा-रोहित पवार

संतोष बांगरने शाळकरी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादावेळी मला आमदार करण्यासाठी दोन दिवस जेवण करू नका, असं आवाहन केलं, यावर रोहित पवार यांनी ट्विट करत चांगलाच समाचार घेतला आहे. लहान मुलांनी संतोष बांगर यांना आमदार करण्यासाठी दोन दिवस जेवण करायचं नाही, म्हणजे ते काय महात्मा लागून गेले का? लहान मुलांसाठी त्यांनी मतदारसंघामध्ये काय काम केलं आहे? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. यांच्यावर कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे.

“लहान मुलांचा प्रचारासाठी वापर करणं गुन्हा”

लहान मुलांचा प्रचारासाठी वापर करणं हा गुन्हा आहे. यामुळे आमदार महाशयांवर कारवाई करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. आचारसंहितेमध्ये लहान मुलांचा वापर करत कोणताही प्रचार करू नये असं त्यात नमूद करण्यात आलं. आता संतोष बांगर यांचा शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये लहान मुलांचा वापर हा प्रचारासाठी करण्यात आल्याचं दिसतंय असा आरोप रोहित पवार यांनी केला.

“मोदी पंतप्रधान नाही झाले तर भरचौकात फाशी घेईल”

संतोष बांगर यांनी आतापर्यंत अनेकदा बेजबाबदार वक्तव्य केलं असल्याचा दावा विरोधकांकडून होताना दिसत आहे. त्यांनी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जर यंदा पंतप्रधान नाही झाले तर मी भरचौकात फाशी घेईल, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये ते लहान विद्यार्थ्यांचा वापर करत प्रचार करत आहेत. आमदार महाशयांवर करवाई झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

निवडणूक आयोग शाळेमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करते. वेगवेगळ्या उपक्रमातून नवयुवकांना आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जातं. यावेळी लहान मुलांचा वापर करू नये असा नियम आचारसंहितेत घालून दिला जातो. मात्र आमदार संतोष बांगर यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लहान मुलांचा प्रचारासाठी वापर होत असल्याचं पाहायला मिळतंय.

News Title – Rohit Pawar vs Santosh Bangar About viral school students video

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारनं फसवलं! आता मी…; मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या घोषणेनं खळबळ

टीम इंडियाला मोठा धक्का! 2 दिग्गज खेळाडू संघातून बाहेर; BCCIनं आणला नवा हुकूमी एक्का

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”