Raj Thackeray Babri masjid brick | अनेक वर्षांपासून बाबरी मशिदीवरून वाद पाहायला मिळत होता. अनेक शिवसैनिकांनी तसेच हिंदूंनी काही कारसेवकांनी बाबरी मशीदीचा ढाचा पाडला होता. त्यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी घडलेल्या घटनांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. (Raj Thackeray Babri masjid brick)
1992 मध्ये आयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली होती. यावेळी आणलेली वीट मनसे नेते बाळ नांदगावर यांनी थेट राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केली आहे. राज ठाकरे यांनी बाबरीच्या ढाच्याची वीट (Raj Thackeray Babri masjid brick) ही पुण्याला घेऊन आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी या विटेबद्दलचं महत्त्व पटवून दिलं आहे. त्यांनी ही वीट पुण्यात आणल्याचं कारण सांगितलं आहे.
बाळा नांदगावकर कारसेवक होते. त्यावेळी अनेक कारसेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याचं काम केलं होतं. त्यावेळी बाळा नांदगावकर यांनी ही वीट आणली आहे. त्यांनतर त्या विटेचं करायचं काय? म्हणून ती वीट त्यांनी राज ठाकरे यांना दिली होती. त्यांनंतर ही वीट घरात ठेवून करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाल्यानं राज ठाकरे यांनी ही वीट पुण्यातील इतिहास मंडळाला दिली आहे. यावेळी त्यांनी इतिहासावर नजर टाकली आहे.
इतिहासावर प्रकाश,२५ लाखांची मदत
राज ठाकरे विटेबाबत सांगत असताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्राचा इतिहास वाचावा कारण सध्या जे सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं ते शिकायला मिळेल. आपण आपल्या महापुरूषांना जातीत पाहतो. त्यावरूनच राजकारण केलं जाातंय. हे महाराष्ट्रामध्ये अधिक सुरू असलेलं पाहायला मिळतंय. इतिहास संशोधन करणारी ही संस्था असून अशा संस्थांसाठी काहीतरी करावसं वाटतं. यासाठी मी 25 लाख रूपये देत आहे, अशी घोषणा त्यांनी केली होती.
इतिहास मंडळाशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर राज्यातील जातीयवादावर भाष्य केलं आहे. ब्रिटनमध्ये पुतळे का नाही? आमचा इतिहास हा जातीपातीतून विभागला जातो. तसेच आपले महापुरूष जातीजातीत वाटले आहेत. ब्रिटनमध्ये पुतळे का नाहीत? कारण तिथले लोकं म्हणतात की आमच्या रक्तात महापुरूष आहेत.
वीट इतिहास संशोधकांच्या हातात-
बाळ नांदगावकर यांनी बाबरीचा ढाचा पाडताना तिथली वीट आणली होती. त्यावेळी अनेक कारसेवक गेले होते. एक हातोडा मारला आणि बाबरी पडली असं झालं नाही. त्यावेळीचं स्ट्रक्चर कसं होतं. ही वीट बाळा नांदगावकरकडं किंवा माझ्याकडं ठेऊन काय करू. त्यामुळे या वीटेचं इतिहास संशोधक आणखी चांगलं संशोधन करतील. ही वीट चांगल्या हातात जावी हा माझा हेतू होता, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
News Title: Raj Thackeray Babri masjid brick
महत्त्वाच्या बातम्या
“पोलीसांच्या संगनमताने माझ्यावर हल्ला…”, निखिल वागळे यांचा गंभीर आरोप
मोठी बातमी! अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली
‘या’ राशीच्या लोकांना आज धनलाभ होणार!
राज्यातील ‘या’ भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी!
सरकारनं फसवलं! आता मी…; मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या घोषणेनं खळबळ