मोठी बातमी! अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली

Mithun Chakraborty | ‘डिस्को डान्सर’ म्हणून प्रचलित असलेले बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आज (10 फेब्रुवारी) कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप काही माहिती समोर आली नाहीये. मात्र, चाहत्यांना या बातमीमुळे मोठा धक्का बसला आहे. मिथुनदा यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, यासाठी सर्वच चाहते प्रार्थना करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

अभिनेते मिथुनदा (Mithun Chakraborty) यांचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे. यात त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या मिथुनदा यांचीच चर्चा होत आहे. याबाबत सविस्तर अशी कोणतीच माहिती समोर आली नाही.

मात्र, मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याने या संदर्भात माहिती दिली आहे. “ते गेल्या आठवड्यापासून आजारी होते. त्यांना किडनी स्टोनची समस्या आहे. यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना अस्वस्थता जाणवत होती. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.”, असे मिथुन यांच्या मुलाने सांगितले आहे.

मिथुन चक्रवर्ती पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

मिथुनदा (Mithun Chakraborty) गेल्याच आठवड्यात त्यांच्या आगामी ‘शास्त्री’ या चित्रपटासाठी काम करत होते. मात्र, अचानक तब्येत खालवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. याचा व्हिडिओ त्यांच्या मुलाने शेअर केला होता.

“मला खुप जास्त आनंद होत आहे.सध्या मला काय वाटतेय मी शब्दांत सांगू शकत नाही. खूप त्रासानंतर जेव्हा एवढा मोठा सन्मान मिळतो तेव्हा मिळणारा आनंद काहीसा वेगळाच असतो. माझ्या कर्तृत्वाला मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे.”, असे मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले होते. सध्या ते रुग्णालयात दाखल आहेत.

News title –  Actor Mithun Chakraborty admitted to hospital

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारनं फसवलं! आता मी…; मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या घोषणेनं खळबळ

टीम इंडियाला मोठा धक्का! 2 दिग्गज खेळाडू संघातून बाहेर; BCCIनं आणला नवा हुकूमी एक्का

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”