“पोलीसांच्या संगनमताने माझ्यावर हल्ला…”, निखिल वागळे यांचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nikhil Wagle | पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर काल (9 फेब्रुवारी) पुण्यात हल्ला करण्यात आला. पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या राष्ट्रसेवा दलात निखिल वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या. शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

निखिल वागळे यांच्यावर गुन्हा दाखल

या प्रकरणी गाडी फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच महाविकास आघाडीचे नेते-कार्यकर्ते, निखील वागळे (Nikhil Wagle) आणि निर्भय बनो सभेचे आयोजक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीचा आदेश असतानाही सभा घेतल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल वागळे हल्ल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह एकूण 43 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.या हल्ल्यानंतर आता निखिल वागळे यांनी आपली पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुकवर या संदर्भात पोस्ट करत नेमकं काय घडलं याची हकीकत सांगितली आहे.

निखिल वागळे यांची फेसबुक पोस्ट

प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो, काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.
मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..कॉँग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी (Nikhil Wagle) ऋणी आहे.

आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.

आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू? जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच. अशी पोस्ट निखिल वागळे यांनी केली आहे.

News title –  Nikhil Wagle post in discussion after the attack

 महत्वाच्या बातम्या- 

सरकारनं फसवलं! आता मी…; मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या घोषणेनं खळबळ

टीम इंडियाला मोठा धक्का! 2 दिग्गज खेळाडू संघातून बाहेर; BCCIनं आणला नवा हुकूमी एक्का

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”