सरकारनं फसवलं! आता मी…; मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या घोषणेनं खळबळ

Manoj jarange patil | शिंदे सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. असे असतानाही त्यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याची घोषणा केली आहे. आता जरांगे (Manoj jarange patil ) यांच्या काय मागण्या आहेत, त्यांनी कशासाठी उपोषणाचा निर्णय घेतला याबाबत त्यांनी मिडियाशी संवाद साधत स्पष्टीकरण दिले आहे.

जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली-सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला आज (10 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात केली आहे. सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारुन तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं. आम्ही सांगितलं, त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी, असे जरांगे म्हणाले आहेत.

पाणी अन्न काही घेणार नाही-

यावेळी जरांगे पाटील (Manoj jarange patil ) यांनी कठोर उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने दोन दिवसात अधिवेशन बोलवावं आणि आमच्या मागण्यासाठी लवकर पाऊल उचलावे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार. यावेळी मी उपचार, पाणी अन्न काही घेणार नाही, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

सरकारने आमच्या मागण्यासाठी 15 तारखेला विशेष अधिवेशन बोलावले आहे. पण, एक दिवसांत हे सगळं शक्य होईल का?. जर तुम्ही 10 तारखेला यासाठी प्रक्रिया सुरू केली तर 14 तारखेला कायदा मंजूर करता येईल म्हणून पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे जरांगे यांनी म्हटलं आहे.

जरांगे पाटील यांची मोठी मागणी-

शिंदे सरकारने मराठा समाजावर झालेले गुन्हे मागे घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील गुन्हे अजून मागे घेतलेले नाही. आमच्यापेक्षाही भयानक गुन्हे मागे घेतले आहेत, त्यामुळे याबाबतही लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जरांगे पाटील (Manoj jarange patil ) यांनी केली आहे.

News title –  Manoj Jarange Patil announces hunger strike again 

 महत्वाच्या बातम्या- 

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात