“..तर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ फोटो पोस्ट करत राऊतांचा प्रहार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Murder) यांच्यावर 8 जानेवारीला दहिसर येथील माॅरिस नामक व्यक्तीनं गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधक या मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला वेठीस धरत आहेत. त्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही होत आहे. यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्याने (sanjay raut) केलेल एक ट्वीट चर्चेत आले आहे.

विरोधकांच्या या मागणीला फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.  ‘एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी, विरोधक राजीनामा मागतील.’, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानालाच आता ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

“गुंडांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य”

“गृहमंत्री देवेंद्र जी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडा साठी चालविलेले राज्य! नाशिक शहर परिसरात हत्या, अपहरण, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे. तुमचे मुख्यमंत्री देखील खुषीत आहेत. हे असे असल्यावर दोन पायांची कुत्र्याची पिल्ले नाहक मरणारच.”, असा टोला संजय राऊत (sanjay raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) याबाबत पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि वेंकट मोरे यांचा एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा हा वाद चिघळला आहे. गृहमंत्री राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकवण्यात सपशेल फोल ठरले असल्याची टीका विरोधक करत आहेत.

“..तर SIT स्थापन करा”

यासोबतच संजय राऊत यांनी एक मोठी मागणीही केली आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे यांचे गुंडांशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. राऊत (sanjay raut) यांचे हे ट्वीट आता चर्चेत आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ‘ते’ विधान चर्चेत

विरोधकांच्या राजीनामा देण्याच्या मागणीवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. उद्या माझ्या गाडीखाली जरी श्वान आलं तरीही ते मला राजीनामा मागायला लावतील. अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही वैमनस्यातून झाली आहे. याप्रकरणावर त्यांनी मला राजीनामा मागणं यात मला काही आश्चर्य वाटणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. या विधानालाच संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी प्रत्युत्तर दिले.

News Title- Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis 

महत्वाच्या बातम्या- 

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात