चाहत्यांना धक्का! विराट कोहलीबाबत सर्वांत मोठी बातमी समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs ENG Test Series | इंग्लंडविरुद्धची (IND vs ENG Test Series ) कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट (Virat Kohli) अनुपस्थित होता. तेव्हापासूनच विराट पुढच्या सामन्यातही माघार घेणार, अशा चर्चा रंगत होत्या. चाहत्यांकडून या संदर्भात वेगवेगळे अंदाज बांधले गेले.

विराटच्या आयुष्यात काही मोठा प्रॉब्लेम झालाय का, असा प्रश्न चाहत्यांनी केला होता. तर काही अनुष्का पुन्हा एकदा गरोदर असल्याचे म्हणत होते. आता या सर्व चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. विराटच्या अनुपस्थितीमागील कारण आता समोर आले आहे.

विराटने घेतला मोठा निर्णय

इंग्लंडसोबतच्या (IND vs ENG Test Series ) उर्वरित तीन सामन्यात विराट खेळणार याची सर्वांना आशा लागली होती.मात्र, त्यावर आता पाणी फेरले आहे. विराट कोहली हा इंग्लंडविरुद्धच्या उरलेल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याने अनुपस्थितीबाबत संघ व्यवस्थापनाला व निवड समितीला कळवलं आहे.

विराटने वैयक्तिक कारण देत मालिकेपासून माघार घेतली आहे. पदार्पणानंतर आजतागायत घरच्या मैदानावरच्या कसोटी मालिकेत विराट पहिल्यांदाच खेळणार नसल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. निवड समिती सदस्यांची काल (9 फेब्रुवारी) उर्वरीत तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ निवडीबाबत बैठक घेण्यात आली होती.

‘हा’ खेळाडूही मालिकेतून बाहेर

दरम्यान, विराट कोहलीपाठोपाठ भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हाही दुखापतीमुळे मालिकेत (IND vs ENG Test Series ) खेळणार नाही. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या श्रेयसवर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. आता, उर्वरीत तीन सामन्यांसाठी भारतीय संघ नेमका कसा असेल? याची उत्सुकता चाहत्यांना निर्माण झाली आहे. उर्वरीत तीन सामने हे राजकोट, रांची आणि धरमशाला या ठिकाणी होणार आहेत.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “BCCI विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करते. संघ व्यवस्थापनाचा विराटच्या निर्णयाला पाठिंबा आहे. भारताच्या उर्वरीत संघाच्या क्षमतांवर बीसीसीआयला पूर्ण विश्वास आहे.”, असे जय शाह यांनी म्हटले आहे.

News title – Virat Kohli will not play in IND vs ENG Test Series

महत्त्वाच्या बातम्या-

मॉरिसनं 10 दिवसांपूर्वी टाकलेल्या पोस्टमध्ये दिले होते संकेत, काय होती ती पोस्ट?

“गाडीखाली श्वान आलं तरी…”, घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“रविंद्रला क्रिकेटर नसतं बनवलं तर बरं झालं असतं”

“घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला शिंदेंनी दिली होती ऑफर”, नव्या दाव्याने मोठी खळबळ

बापाकडूनच पोटच्या मुलीवर बलात्कार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने प्रकार उजेडात