पुस्तकांवर धूळ साचल्यानं कहाणी संपत नाही; संघातून वगळल्यानं भारतीय खेळाडूची खदखद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Umesh Yadav | इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली. जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीत विश्रांती मिळू शकते, अशी चर्चा होती. (India vs England Test Series) पण बुमराहला संघात स्थान देण्यात आले असून विराट कोहलीचे अद्याप पुनरागमन झाले नाही. श्रेयस अय्यरला आगामी तीन सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. कारण तो मागील काही सामन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे.

खरं तर लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांचे संघात नाव असले तरी त्यांच्या फिटनेसवर सर्वकाही अवलंबून आहे. एकूणच ते तंदुरूस्त असले तरच आगामी सामन्यांमध्ये दिसतील. आकाश दीपला वेगवान गोलंदाज म्हणून टीम इंडियात स्थान मिळाले आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग राहिला आहे.

भारत विरूद्ध इंग्लंड थरार

दरम्यान, भारतीय संघ सध्या मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळपट्ट्यांवर प्रभावी ठरणारा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा संघात समावेश व्हायला हवा, असे जाणकारांनी सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा संघातून वगळल्यानंतर उमेश यादवने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली आहे. उमेशने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत आपली व्यथा मांडली.

36 वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून म्हटले, “पुस्तकांवर धूळ जमा झाल्यामुळे कथा कधीच संपत नाही. उमेश यादव भारतीय खेळपट्ट्यांवर त्याच्या दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवड न झाल्याने त्याने जाहीरपणे नाराजी बोलून दाखवल्याचे दिसते. उमेशने भारताकडून शेवटची कसोटी गेल्या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. यानंतर त्याची कसोटी संघात निवड झाली नाही.

Umesh Yadav ची खदखद

उमेश यादवने भारताकडून आतापर्यंत 57 कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर 170 बळींची नोंद आहे. उमेशने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. या मोसमात रणजी करंडक खेळण्यासाठी आलेल्या उमेशने अवघ्या तीन सामन्यांत 18 बळी घेत इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी दावा ठोकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gujarat Titans (@gujarat_titans)

 

इंग्लंडविरूद्धच्या 3 सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, लोकेश राहुल (फिटनेसवर अवलंबून), रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक ), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

News Title- IND vs ENG Team India’s fast bowler Umesh Yadav posted an Instagram story in which he is seen to be upset
महत्त्वाच्या बातम्या –

‘चॅम्पियन’ सनरायझर्सवर पैशांचा पाऊस! काव्या मारनच्या संघाने दुसऱ्यांदा जिंकला किताब

तुझी पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? कंगनाचं उत्तर अन् पिकला एकच हशा

मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…

संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”

समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर