लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे बनतील; नितीन गडकरी यांचे मोठे विधान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विकसित भारताबद्दल भाष्य करताना आगामी काळातील प्रकल्पांबद्दल सांगितले आहे. लवकरच भारताचे रस्ते सर्वात विकसित आणि श्रीमंत अशा अमेरिकेतील रस्त्यांसारखे होतील. देशातील रस्ते आणि महामार्ग सुधारण्यासाठी भारत सरकार दिवसेंदिवस काम करत आहे. त्याचबरोबर तो दिवस दूर नाही जेव्हा भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, देशाला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात रस्त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. भारताचे रस्ते जगात कधी नंबर वन होतील याबाबातही त्यांनी भाष्य केले. रस्त्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे गडकरींनी नमूद केले.

“भारताचे रस्ते अमेरिकेसारखे बनतील”

गडकरी म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस भारतातील रस्त्यांचे जाळे अमेरिकेसारखेच चमकदार होईल. केंद्र सरकार देशभरात 36 एक्सप्रेस हायवे बांधत आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. दिल्ली ते चेन्नईला जोडणाऱ्या महामार्ग प्रकल्पाच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर 320 किमीने कमी होणार आहे. आसाममधील नुमालीगडमध्ये बांबूपासून इथेनॉल तयार केले जात आहे. इंधनातील बदलामुळे आणि चांगल्या रस्त्यांच्या विकासामुळे देशातील खर्चाला आळा बसेल.

तसेच एक गोष्ट स्पष्ट आहे की, भांडवली गुंतवणूक आणि उद्योगाचा विकास हवा असेल तर चांगल्या पायाभूत सुविधा हव्या आहेत. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण याशिवाय आपण शेती, सेवा आणि उद्योगाचा विकास करू शकत नाही. पायाभूत सुविधांशिवाय पर्यटनाचा विकास होऊ शकत नाही, असेही गडकरींनी सांगितले.

Nitin Gadkari यांनी सांगितली योजना

गडकरींनी आणखी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार आले. तेव्हापासून आम्ही रस्त्यांच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले.

“आपण एक महान देश विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा आपल्याला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देखील विकसित कराव्या लागतील आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. ईशान्येकडील आसाम राज्यात बांबूपासून इथेनॉल तयार केले जात आहे. यामुळे खर्चावर नियंत्रण राहते, चांगले रस्ते हा एक विकासाचा मोठा मार्ग आहे”, अशा शब्दांत गडकरींनी सरकारच्या कामांचा पाढा वाचला.

News Title- Soon the roads of India will become like America, said Nitin Gadkari
महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक! 20 महिलांवर अधिकाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार; अंगणवाडीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं

पुस्तकांवर धूळ साचल्यानं कहाणी संपत नाही; संघातून वगळल्यानं भारतीय खेळाडूची खदखद

‘चॅम्पियन’ सनरायझर्सवर पैशांचा पाऊस! काव्या मारनच्या संघाने दुसऱ्यांदा जिंकला किताब

तुझी पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? कंगनाचं उत्तर अन् पिकला एकच हशा

मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…