ऑस्ट्रेलियाला घाम फोडणाऱ्याला 3 कोटी मिळाले; वेस्ट इंडिजच्या नवख्या गोलंदाजाची IPL मध्ये एन्ट्री

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | ऑस्ट्रेलियाविरूद्ध अप्रतिम कामगिरी करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या वेस्ट इंडिजच्या नवख्या गोलंदाजाला लॉटरी लागली आहे. वेस्ट इंडिजच्या या वेगवान गोलंदाजाने नुकतेच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत केले होते. खरं तर कॅरेबियन खेळाडू शामर जोसेफची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. जोसेफने ऑस्ट्रेलियाच्याच धरतीवर कांगारूंच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याने गाबा कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 7 बळी घेतले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ 27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.

शामर जोसेफने नुकतेच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात गाबामध्ये हादरवून सोडले होते. जोसेफने ऑस्ट्रेलियाविरूद्ध चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवण्यासाठी नेहमीच वेस्ट इंडिजच्या संघाचा कस लागला आहे. मात्र, जोसेफच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर कॅरेबियन संघाने लाजिरवाणा विक्रम मोडीत काढला आणि विजय साकारला.

नवख्या गोलंदाजाची IPL मध्ये एन्ट्री

शामर जोसेफ आता आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघात खेळताना दिसणार आहे. मार्क वुडच्या जागी जोसेफचा लखनौच्या संघात समावेश करण्यात आला आहे. या करारासाठी जोसेफला 3 कोटी रुपये मिळाले आहेत. जोसेफचा हा पहिलाच आयपीएल हंगाम असेल. शामर जोसेफने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले आणि केवळ दोन कसोटी सामन्यांनंतर हा खेळाडू रातोरात जगभरात लोकप्रिय झाला.

दरम्यान, शामर जोसेफने कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला बाद केले होते. यानंतर जोसेफने याच डावात आणखी 4 बळी घेतले. गोलंदाजी करण्यापूर्वी जोसेफ या सामन्यात अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जिथे त्याने ऑस्ट्रेलियाच्या प्राणघातक आक्रमणाविरुद्ध 36 धावा कुटल्या.

 

IPL 2024 साठी फ्रँचायझी सज्ज

त्यानंतर पुढच्याच सामन्यात एकाच डावात सात बळी घेऊन जोसेफने प्रसिद्धी मिळवली. बलाढ्य आणि विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध विक्रमी कामगिरी केल्यामुळे कॅरेबियन खेळाडूचे मानधन वाढल्याचे दिसते. कारण लखनौच्या फ्रँचायझीने जोसेफवर विश्वास दाखवला असून त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. मार्क वुडच्या जागी शामर जोसेफ आगामी आयपीएल हंगामात लखनौच्या गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसणार आहे.

शामर जोसेफचा इथपर्यंतचा प्रवास खूप अडचणींनी भरलेला होता. गयानामधील बारकारा या छोट्याशा गावात जन्मलेला जोसेफ पाच भाऊ आणि तीन बहिणींच्या मोठ्या कुटुंबात वाढला. त्याचे जीवन इतके कठीण होते की न्यू ॲमस्टरडॅम शहरात जाण्यासाठी त्याला 2 दिवस बोटीने प्रवास करावा लागायचा. पण त्याला क्रिकेटची खूप आवड होती. क्रिकेटप्रती असलेले प्रेम, जिद्द आणि मेहनत जोसेफला जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीगमध्ये घेऊन आली.

News Titlle- West Indies fast bowler Shamar Joseph has been buy in by the Lucknow Super Giants franchise for IPL 2024 for Rs 3 crore
महत्त्वाच्या बातम्या –

लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे बनतील; नितीन गडकरी यांचे मोठे विधान

पुण्यातील बुधवार पेठेत एकाचा वस्तऱ्याने गळा चिरला, अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

धक्कादायक! 20 महिलांवर अधिकाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार; अंगणवाडीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं

पुस्तकांवर धूळ साचल्यानं कहाणी संपत नाही; संघातून वगळल्यानं भारतीय खेळाडूची खदखद

‘चॅम्पियन’ सनरायझर्सवर पैशांचा पाऊस! काव्या मारनच्या संघाने दुसऱ्यांदा जिंकला किताब