गांगुलीच्या घरात चोरट्यांची ‘दादा’गिरी! महागडा फोन लंपास, पोलिसांत तक्रार दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sourav Ganguly | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरी चोरी झाली आहे. चोरीच्या घटनेनंतर भारतीय दिग्गजाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गांगुलीच्या घरी घडलेल्या या घटनेत त्याचा फोन चोरीला गेला असून त्यात अनेक महत्त्वाचे नंबर आणि महत्त्वाची माहिती उपलब्ध असल्याचे त्याने सांगितले. क्रिकेटच्या दादाने आता पोलिसांची मदत घेतली आहे.

बेहाला येथील घरात पेंटिंगचे काम सुरू असताना माजी भारतीय खेळाडूसोबत ही घटना घडली. बराच शोध घेतल्यानंतरही फोन न सापडल्याने सौरव गांगुलीने स्थानिक ठाकूरपुकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 19 जानेवारीला त्याच्यासोबत ही घटना घडली होती. अशा स्थितीत घरात काम करणाऱ्या कारागिरांचीही पोलीस चौकशी करू शकतात.

चोरट्यांची ‘दादा’गिरी!

मिळालेल्या माहितीनुसार, गांगुलीचा फोन चोरीला गेला असून त्या फोनची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रार पत्रात गांगुलीने लिहिले की, मला वाटते की माझा फोन घरातून चोरीला गेला आहे. मी शेवटचा फोन 19 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता तपासला. त्यानंतर मी माझा फोन शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही.

तसेच माझा फोन हरवल्यामुळे मला दु:ख झाले आहे कारण त्यात अनेक नंबर आणि वैयक्तिक माहिती आहे. मी फोनचा शोध घेण्याची किंवा योग्य कारवाई करण्याची विनंती करत आहे. भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला गांगुली सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा संचालक आहे.

Sourav Ganguly च्या घरात चोरी

अलीकडेच या दिग्गजाने अंडर-19 विश्वचषकाचे आयोजन करण्याबाबतही चर्चा केली होती. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर अंडर-19 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे.

दरम्यान, सौरव गांगुली अलीकडेच आयपीएलच्या मिनी लिलावात दिसला होता. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीसाठी रणनीती करताना स्टार खेळाडूंवर बोली लावली. आगामी आयपीएल हंगामाला लवकरच सुरूवात होणार असून जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीगला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे.

News Title- former bcci president and indian captain Sourav Ganguly’s phone worth Rs 1.6 lakh stolen, read here details
महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाला घाम फोडणाऱ्याला 3 कोटी मिळाले; वेस्ट इंडिजच्या नवख्या गोलंदाजाची IPL मध्ये एन्ट्री

लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे बनतील; नितीन गडकरी यांचे मोठे विधान

पुण्यातील बुधवार पेठेत एकाचा वस्तऱ्याने गळा चिरला, अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

धक्कादायक! 20 महिलांवर अधिकाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार; अंगणवाडीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं

पुस्तकांवर धूळ साचल्यानं कहाणी संपत नाही; संघातून वगळल्यानं भारतीय खेळाडूची खदखद