लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या बृजभूषण सिंहांना मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Brijbhushan Singh | भाजपचे उत्तर प्रदेशचे विद्यमान खासदार बृजभूषण सिंह यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. भाजपने उत्तर प्रदेशमधील निवडणुकीची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बृजभूषण सिंह यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघात बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) ऐवजी त्यांचे पुत्र किरण सिंह यांना भाजपने दिली आहे. मागील वर्षी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावलेत.

बृजभूषणचा पत्ता कट

कैसरगंज लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्थानिक निवड समितीकडून बृजभूषण यांचं नाव देण्यात आलं होतं. मात्र भाजपच्या वरिष्ठ निवड समितीने विद्यमान खासदार बृजभूषण (Brijbhushan Singh) यांचं तिकीट कापून लेकाला तिकीट दिलं आहे. बृजभूषण (Brijbhushan Singh) यांनी कैसरगंज जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शवली होती. मात्र त्यांना भाजपच्या वरिष्ठ निवड समितीने संदेश दिला.

ऑलिम्पिक कुस्तीपटूंनी बृजभूषण (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांसह महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाप्रकरणी मोदी सरकारवर विरोधात आंदोलन केलं होतं. महिला कुस्तीपटूंनी पदकं देखील नदीत विसर्जित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वरिष्ठांनी समज दिल्यानंतर त्यांनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला.

ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटूंनी आंदोलन केलं होतं. तेव्हा देशातील अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेस, इतर विरोधक पक्षांनी देखील मोदी सरकारविरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. बृजभूषण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र राजीनामा न दिल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. आता पुन्हा एकदा बृजभूषण सिंह यांना तिकीट दिलं जाणार का?, यावर प्रश्नचिन्ह होतं. मात्र त्यांचं तिकीट कापण्यात आलं.

भृजभूषणचा पत्ता कट मात्र लेकाला तिकीट

बृजभूषण यांचा पत्ता जरी कट केला असला तरीही भाजपने त्यांच्याच घरात तिकीट दिलंय. बृजभूषणचा मुलगा किरणसिंह यांना केसरगंज लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने त्यांच्याच घरात उमेदवीर देऊन समाधान केलं आहे.

News Title – Brijbhushan Singh Ticket Cut Kaisarganj Loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका!

‘चित्रा वाघ आधी रेवण्णा सेक्स स्कँडलवर बोला’; आदित्य ठाकरेंनी सुनावलं

‘या वयात साहेबांना सोडायला नको होतं’; काय म्हणाले अजित पवार?

‘थॅंक्स टू गद्दार लोक्स’; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

“भाजपला मतदान करा”; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ