“दादांना साहेबांचा आवाका माहित असता तर…”; रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर सतत आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यातील शाब्दिक चकमक तर प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे.

बारामतीमध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या जोरदार प्रचार केला जात आहे. अशात रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित दादांवर निशाणा साधत टीका केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

‘तिकडे मलिदा गँग आहे आणि इकडे जनता आहे. त्यामुळे जनता विरुद्ध नेता अशी लढत होईल. साडेतीन लाख ते चार लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील’, असा दावाच रोहित पवार यांनी केलाय. इतकंच नाही तर त्यांनी गंभीर आरोपही केला आहे.

‘पक्ष चोरीला गेला, चिन्ह चोरीला गेले. लोकसभेच्या सहा महिने आधी ती सगळी यंत्रणा चोरीला गेली. ती सगळी यंत्रणा दादा स्वतःसाठी वापरत आहेत. ज्या मैदानावर गेली 40 वर्ष सभा होते ते मैदानही चोरीला गेलं आहे. असं असलं तरी लोकांचा विचार चोरीला जाऊ शकत नाही, तोच विचार आणि तीच ताकद आणि विजय हा तुतारीचा झाल्याशिवाय राहणार नाही.’, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.

“पैशाची ताकद मोठी की लोकांची ताकद मोठी हे..”

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, “दादांना साहेबांचा आवाका माहित असता तर दादांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. आम्ही का लढतोय हे आम्हाला माहित आहे, ते सत्तेसाठी गेले ते त्यांना माहित. आमच्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत म्हणून आम्ही विचारासाठी लढत आहोत.”

यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोलाही लगावला.”पैशाची ताकद मोठी की लोकांची ताकद मोठी हे लवकरच कळेल. मात्र, दादा जर आता पूर्वी बोलले त्याच्या उलट बोलत असतील तर एवढा बदल आम्ही दादामध्ये पहिला नाही. आजचे भाजपची भूमिका सांगणारे दादा आता सोसायटीमध्ये, गल्लीबोळात प्रचार करू लागले आहेत”, अशी टीका रोहित पवारांनी (Rohit Pawar) केली आहे.

News Title : Rohit Pawar criticizes Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

‘या वयात साहेबांना सोडायला नको होतं’; काय म्हणाले अजित पवार?

‘थॅंक्स टू गद्दार लोक्स’; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल

“भाजपला मतदान करा”; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

शेकापचं अस्तित्व धोक्यात?; जयंत पाटलांमुळे पक्षाला गळती

“चित्राबाई पॉर्न बघत असतील, आक्रस्थळी बाईने…”, अंधारेंचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर