संजय राऊतांकडून आणखी एक मोठा गौप्यस्फोट!

Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. गणपत गायकवाड प्रकरण सुरू असताना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नामक व्यक्तीनं गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्याप्रकरणातच मॉरिसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. आता आणखी एका गुन्हेगारासोबत मुख्यमंत्र्यांचा फोटो संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत टीकेचे बाण सोडले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत (Sanjay Raut) हे थांबायचं नाव घेताना दिसत नाहीत. ते दररोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यांसोबतचा एक फोटो व्हायरल करत त्यावर ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना धारेवर धरत आहेत. यात ते कोणतीही कसर सोडत नाहीत. अशातच आता त्यांनी हे लालसिंग महोदय कोण आहेत? पैचान कोण?, असा ट्वीटमध्ये सवाल केला आहे.

संजय राऊतांचं ट्वीट?

“पैचान कौन? मा. गृहमंत्री महोदय, हे लाल सिंग महोदय आहेत. खंडणी.. अपहरण..अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्हातील आरोपी. टीम मिंधे चे खास मेंबर.. काय करणार तुम्ही? गुंडांनी गुंडासाठी चालवलेले राज्य!”, असं ट्वीट करत त्यांनी मुख्यमंत्री यांना धारेवर धरलं आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंसोबत काही गुन्हेगारांचे फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केले आहेत. त्यामध्ये गणेश घायवळ, श्रीकांत शिंदेसोबत हेमंत दाभेकर, जितेंद्र जंग, मॉरिस नऱ्होना, आता लालसिंह अशा गुन्हेगारांचे फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केले आहेत.

सामन्यातून टीकेचे चाबूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नैतिकतेच्या गप्पा मारतात पण त्यांच्या आशीर्वादाने राज्यात गुंडाराज सुरू आहे. यावर भाजप काही बोलत नाही. व्यापारी, दुकानदार सरकारी गुंडांना खंडणी देऊन थकले आहेत. मुख्यमंत्री आणि गुंड यांच्यामध्ये अनेकदा बैठकी होतात हे गंभीर वाटत नाही का? असा सवाल आता विचारला आहे.

“देशात गुंडाराज सुरू आहे आणि हे केवळ फक्त मोदी-शहांमुळे झालं आहे. गुंड खुलेपणाने राज्य सरकारला भेटू शकतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. अभिजीत घोसाळकर याने शिवसेना युवा नेत्यावर गोळ्या झाडून हत्या केली आहे. बंदूक चालवण्याचा अत्मविश्वास आला हेत गुंडाराज”, अशी टीका संजय राऊत यांनी केलीये.

News Title – Sanjay raut tweet photo eknath shinde with goon lal singh

महत्त्वाच्या बातम्या

गांगुलीच्या घरात चोरट्यांची ‘दादा’गिरी! महागडा फोन लंपास, पोलिसांत तक्रार दाखल

ऑस्ट्रेलियाला घाम फोडणाऱ्याला 3 कोटी मिळाले; वेस्ट इंडिजच्या नवख्या गोलंदाजाची IPL मध्ये एन्ट्री

लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे बनतील; नितीन गडकरी यांचे मोठे विधान

पुण्यातील बुधवार पेठेत एकाचा वस्तऱ्याने गळा चिरला, अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

धक्कादायक! 20 महिलांवर अधिकाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार; अंगणवाडीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं