“असल्या भंगार माणसाला…”, मनोज जरांगे पाटील भुजबळांवर भडकले

Manoj Jarange Patil | गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याची सुरूवात ही मराठा मोर्चापासून झाली. अंतरवाली सराटीमध्ये भुजबळांनी मराठा बांधवांवर लाठी हल्ला केल्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली होती. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत सरकारकडे मागणी केल्यापासून भुजबळ मनोज जरांगे पाटील यांच्यात अधिक वाद सुरू झाला असून वाद संपायचं नाव घेत नाही.

भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याआधी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरीचं नाही खात अशी टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी लोकाचं खाल्ल आणि जेलमध्य गेला अशी टीका केली होती.

मनोज जरांगे पाटील हे देखील भुजबळांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भुजबळही प्रत्युत्तर देतात. काही दिवसांआधी भुजबळ यांनी ओबीसी एल्गार मेळाव्याला संबोधित करत नगरमध्ये “नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार टाका आणि मग भादरू दे त्यांना त्यांची”, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं. यावरून देखील त्यांना राज्यातील अनेक नेत्यांनी धारेवर धरलं होतं. सध्या छगन भुजबळ हे अडचणीत सापडले आहेत. त्यांना धमकी येत आहेत. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आणि यावरच मनोज जरांगे यांनी भाष्य करत त्यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.

भुजबळांना धमकीचं पत्र

सध्या छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी लढत आहेत. आरक्षण वाचवण्यासाठी ते सभा घेताना दिसतात, यामुळेच की काय त्यांना आता अनेक धमकीचे पत्र येवू लागले आहेत. नाशिकच्या कार्यालयाच्या पत्त्यावर छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र येत आहेत. मात्र तरीही लढा सुरूच ठेवणार असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत. त्यांना फोन मेसेजवरून देखील धमकी येत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांना टार्गेट केलं आहे.

मनोज जरांगे आक्रमक

भुजबळ यांनी माध्यमांशी बोलत असताना धमकीचं पत्र तसेच फोन कॉल आणि मेसेजवरून सतत धमक्या येत असल्याचं सांगितलं आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका केली आहे. “छगन भुजबळ यांचं वय झालं आहे. ते म्हातारे झाले आहेत. म्हाताऱ्याला कशाला कोणी मारेल. आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे. असल्या भंगार माणसाला कोण कशाला मारेल”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

त्यानंतर मनोज जरांगे पाटील इथवर न थांबता पुढे म्हणाले, “तेच विचार करून गपकन जातील. हवी तर पोलिसांची वर्दी त्यांना द्या. पोलिसांची वर्दी त्यांना घाला. आपल्यावर सातवेळा घातपाताचा प्रकार घडला आहे, पण आपण कधी आरडा ओरड केली नाही”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली आहे.

 News Title – Manoj Jarange Patil tount to chhagan bhujbal

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…

संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”

समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर

आशियातील ‘या’ 10 देशांंना पर्यटकांची मोठी पसंत, भेट देण्यासाठी वाढली लगबग

‘या’ शेअरच्या कामगिरीनं मार्केट केलंय जाम, 6 महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल