ओवैसींचा लोकसभेत ‘बाबरी मशिद जिंदाबाद’ चा नारा, म्हणतात…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Asududdin Owaisi | देशामध्ये 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. अनेक वर्षांचं असंख्य हिंदूंचं प्रभू श्रीरामाच्या मंदिराबाबतचं स्वप्न पूर्ण झाल्यानं देशामध्ये आनंदाचं वातावरण होतं. काही स्थानिक पातळीवर काही राज्यात छोटे मोठे हल्ले झाले. पण अनेक हिंदूंनी हा दिवस दिवाळीसारखा साजरा केला. याबाबत लोकसभेमध्ये धन्यवाद प्रस्ताव पार पडला. या प्रस्तावात एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी (Asududdin Owaisi) यांनी “बाबरी मशिद जिंदाबाद” असा नारा लगावला आहे.

काय म्हणाले असुदुद्दीन ओवैसी? 

लोकसभेत “बाबरी मशिद जिंदाबाद”, असा नारा लावत असुदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. “मोदी सरकार हे केवळ हिंदूंचे सरकार नाही. देशाला कोणताही धर्म नाही. मी बाबर आणि जिन्नांचा प्रवक्ता नाही. तुम्ही देशातील मुस्लिमांना नेमका कोणता संदेश देत आहात? एका धर्माने दुसऱ्या धर्मावर विजय मिळवणे हा देशाला संदेश देता का?”, असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.

“श्रीरामाचा आदर पण नथूरामाचा नाही”

यावेळी बोलत असताना त्यांनी “मला प्रभू श्रीरामाचा आदर आहे मात्र नथूरामचा आदर करणार नाही. कारण नथूराम यांनी ज्या व्यक्तीला मारले होते त्या व्यक्तीचे शेवटचे शब्द हे राम असे होते. यावेळी बोलताना मला बाबरबद्दल का विचारता? नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्याबाबच विचारा ना?” असे अनेक प्रश्न त्यांनी सभागृहामध्ये उपस्थित केले होते.

ओवैसी बोलत असताना त्यांनी 1992 साली घडलेल्या घटनेवर भाष्य केलं आहे. एका प्रस्तावादरम्यान 1992 साली बाबरी विध्वंसाबाबत खेद व्यक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी संसदेमध्ये सांगितली आहे.

निवडणुकीपूर्वी सीसीए लागू करण्यात येणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं होतं. यावर ओवैसी म्हणाले की “फाळणीपूर्वी बांग्लादेश आणि पाकिस्तानातील लोकांना भारतात पळून जायचं होतं. तेव्हा काँग्रेसने सांगितलं तुम्ही इथं या तुम्हाला नागरिकत्व दिलं जाईल. धार्मिक छळांना समोर जाणाऱ्या अल्पसंख्यांना नागरिकत्व देणं हा सीसीएचा उद्देश आहे”.

सीएएची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. सीएएचा अंमलबजावणी करण्यापासून कोणीही रोखणार नाही, असं ते म्हणाले होते. हा कायदा काँग्रेसनं दिलेल्या वचनानुसार करण्यात येणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे.

News Title – Asududdin Owaisi talk about babri masjid

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी | राज ठाकरेंना मिळालेल्या बाबरीच्या वीटेबाबत मोठी घोषणा… 25 लाख रुपये…

संतोष बांगरच्या विधानावर रोहित पवारांचा पारा चढला; “तो काय महात्मा लागून गेलाय का?”

समीर वानखेडेंवर ईडीची कारवाई; “आर्यन खान प्रकरणात…” मोठं कारण आलं समोर

आशियातील ‘या’ 10 देशांंना पर्यटकांची मोठी पसंत, भेट देण्यासाठी वाढली लगबग

‘या’ शेअरच्या कामगिरीनं मार्केट केलंय जाम, 6 महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल