Abhishek Ghosalkar | दहिसर येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर या प्रकरणातून नवनवीन माहिती आता समोर येऊ लागली असून याची राज्यभर चर्चा आहे. याप्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मॉरिसने आपलं डोकं शांत ठेऊन हा नियोजनबद्ध कट रचला आणि यशस्वी केला. मात्र आता यामध्ये घोसाळकर यांच्यावर झाडलेल्या गोळ्यांचं शस्त्र ही मॉरिसच्या बॉडीगार्डची होते म्हणून आता मॉरिसचा बॉडीगार्ड अडचणीत आला आहे. (Abhishek Ghosalkar)
मॉरिसने अभिषेक घोसाळकरवर आपला बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा यांच्या बंदुकीचा वापर करत गोळीबार केला आहे. त्याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मॉरिसच्या बॉडीगार्डची पत्नी सोनी मिश्नानं आपल्या पतीची कोणतीही चूक नसून त्यांना पोलीस त्रास देत आहेत आणि मारहाण करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावर काहीतरी करावं अशी हळहळ व्यक्त केली आहे. (Abhishek Ghosalkar)
काय म्हणाल्या सोनी मिश्रा?
मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याची बंदुक घेऊन मॉरिसने अभिषेकला गोळ्या घातल्या आहेत. यामुळे मॉरिसला सात दिवसांची पोलीस कोठडी करण्यात आली आहे. यावरून आता बॉडीगार्डची पत्नी सोनी मिश्रानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पदर पसरत विनंती केली आहे. “माझ्या नवऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. त्यांची यामध्ये कोणतीही चूक नाही. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना मारण्यात आलं आहे. त्यांना वागणूकही चांगली देत नसल्याचं”, पत्नी सोनी मिश्रा म्हणाल्या आहेत.
मॉरिसच्या बॉडीगार्ड वकिलांची प्रतिक्रिया
मॉरिसच्या बॉडीगार्डचे वकील रेखा जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या की, “पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली पण आमच्या क्लायंटचा यात काहीही संबंध नाही. ते केवळ तिथं कामाला होते. त्याच्या बंदुकीचा परवाना हा ऑल इंडिया परमिटचा होता. त्यावेळी न्यायालायीन कोठडीची मागणी केली पण पोलीस कोठडीत नेलं”, असल्याची माहिती अॅडव्होकेट रेखा जयस्वाल यांनी दिली.
अभिषेक घोसाळकर यांना गोळीबार केला. तेव्हा अमरेंद्र हे मेहुलची आई करूणा रूग्णालयमध्ये होती त्याठिकाणी होते. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येबाबत माहिती आम्हाला नव्हती. ही माहिती आम्हाला रात्री 3 वाजता समजली, हे ऐकूण आम्हालाही धक्का बसला, अशी माहिती सोनी मिश्राने दिली आहे.
मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांच्यामध्ये चांगले संबंध होते. मात्र मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयामध्ये बोलवून आपल्या बॉडीगार्डच्या बंदुकीनं गोळीबार केल्यानं आता बॉडीगार्ड अडचणीत आला आहे.
News Update – Abhishek Ghosalkar murder news update
महत्त्वाच्या बातम्या
आशियातील ‘या’ 10 देशांंना पर्यटकांची मोठी पसंत, भेट देण्यासाठी वाढली लगबग
‘या’ शेअरच्या कामगिरीनं मार्केट केलंय जाम, 6 महिन्यात गुंतवणूकदार झालेत मालामाल
‘वेलेंटाईन डे’ला आपल्या जोडीदाराला आनंद देण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘या’ भेटवस्तू