मोठी बातमी! भाजप आमदाराच्या मुलाला अटक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ganpat Gaikwad | गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) प्रकरणामध्ये आता नवनीवन खुलासे बाहेर येताना दिसत आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांना हिललाईन पोलीस ठाण्यात गोळ्या घातल्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर गणपत गायकवाड यांना काही दिवसांआधी गजाआड टाकण्यात आलं आहे. अशातच गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडही आता पोलिसांच्या ताब्यात सापडले असून त्यांना अटक झाली आहे.

गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अटकेत

गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांना अटक केल्यानंतर मुलगा वैभव गायकवाड काही दिवसांपासून फरार होता. गणपत गायकवाड यांचा वाहन चालक रंजीत यादव याला आधी पोलिसांनी 11 फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याचदिवशी रांजीत यादवच्या अटकेनंतर वैभव गायकवाड यांना देखील 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दोघेही फरार होते आता एकूण याप्रकरणामध्ये 9 जण अटकेत आहेत.

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे गणपत गायकवाड यांना हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये 14 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. आता याप्रकरणामध्ये 9 जणांना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे.

सीसीटीव्हीमुळे खुलासा

गणपत गायकवाड प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसात गोळीबाराचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत होता. यामध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचा हिललाईन पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये वैभव गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याचा सध्या खोलवर तपास सुरू आहे.

गोळीबाराचा प्रकार होताच गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे. आता आपला पोटचा मुलगा वैभव गायकवाडला देखील पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत अधिक वाढ होऊ लागली आहे. गोळीबाराचं प्रकरण होण्याआधी त्यांनी एका शेतकऱ्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. आता या प्रकारामुळे त्यांच्या अडचणी वाढल्यात.

अंबरनाथ येथील द्वारली गावामध्ये एका शेतकऱ्याच्या जागेवरून वाद झाल्याने गणपत गायकवाड आणि इतर गणपत गायकवाड यांच्या साथीदारांनी शिवीगाळ केली होती. त्यावेळी जागेचे मालक आणि इतर माहिला त्याठिकाणी काम करत होत्या. त्यावेळी त्यांनी शिवीगाळसोबत जातीवाचक वक्तव्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणून आता गणपत गायकवाड यांच्या अडचणीत अधिक वाढ होऊ लागली आहे.

News Title – Ganpat gaikwad son vaibhav gaikwad arrested

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

ओवैसींचा लोकसभेत ‘बाबरी मशिद जिंदाबाद’ चा नारा, म्हणतात…

“असल्या भंगार माणसाला…”, मनोज जरांगे पाटील भुजबळांवर भडकले

संजय राऊतांकडून आणखी एक मोठा गौप्यस्फोट!