सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, शिवप्रेमी संतापले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | एकीकडे सरकार गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मद्यपींनी गड-किल्ल्यांचं पावित्र्य धोक्यात आणलं आहे. पुण्यातील (Pune News) सिंहगडावर नुकतंच एक अत्यंत प्रकार धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे (Pune News) येथील सिंहगडावर दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत.

सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

दहा दिवसांवर शिवजयंती आली असताना किल्ल्यावर तळीरामांची पार्टी केल्याचं दिसून येत आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमी चांगलेच भडकले आहेत. शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

किल्ल्यावर दारुच्या बाटल्या कशा गेल्या? सिंहगडावर असलेले सुरक्षा रक्षक काय करतात? मद्यपी आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई का केली जात नाही?, असे प्रश्न शिवप्रेमींनी विचारले आहेत.

Pune News | शिवप्रेमी संतापले

किल्ले सिंहगडावर दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत. किल्ल्यावर जवळपास 12 वेगवेगळ्या ब्रँडच्या दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. गड-किल्ल्यांचे पावित्र्य धोक्‍यात आल्याचं शिवप्रेमींनी म्हटलंय. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत संताप व्यक्त केला आहे.

पुरातत्त्व विभाग तसेच वन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही किल्ल्यावर मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपानास बंदी आहे. पण वीकेंड पार्ट्यांचं लोण आता गडांपर्यंत येऊन ठेपल्याने पुणे परिसरातील गडकिल्ल्यांवर सध्या दारूपार्ट्यांनी उच्छाद मांडल्याचं दिसत आहे.

दरम्यान, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. यासाठी सरकारने युनेस्को हेरीटेज लिस्ट  साठी प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 12 किल्ल्यांचा हा प्रस्ताव पाठवला आहे. तर दुसरीकडे  किल्ल्यावर हा प्रकार घडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! भाजप आमदाराच्या मुलाला अटक

“मुख्यमंत्रीसाहेब माझ्या नवऱ्याचं…”, मॉरिसच्या बॉडीगार्डच्या पत्नीचं मोठं वक्तव्य

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

ओवैसींचा लोकसभेत ‘बाबरी मशिद जिंदाबाद’ चा नारा, म्हणतात…

“असल्या भंगार माणसाला…”, मनोज जरांगे पाटील भुजबळांवर भडकले