मोठी बातमी! बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर शाईफेक, नेमकं काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

बारामती | आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून (Ncp) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशा चर्चा सुरु आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना विजयी करावं, अशा आशयाचा आणि अजित पवार आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे फोटो असलेला फलक काऱ्हाटी गावात एका शेती फार्मच्या मालकानं लावला होता. त्या फलकावर शाईफेक करण्यात आलेली आहे.

शाईफेकीच्या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.. दरम्यान फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक उतरवला आहे.

Sunetra Pawar | नेमकं काय घडलं?

बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या फलक उभारले जात. असाच एक फलक काऱ्हाटी गावात लावण्यात आला आहे.

काऱ्हाटीतील एका शेती फार्मच्या मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन कोणीतरी शाई फेकली. यामुळे खळबळ माजली आहे.

या बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा संबंधित फलकावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या फलकावर अजित पवार यांचा देखील फोटो वापरण्यात आला होता.

शाईफेकीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कोणी केली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. हे जे केलंय ते चुकीचं आहे. कुणाचाही बॅनर लावला असेल त्याच्यावर शाही फेकणं हे अतिशय चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, शिवप्रेमी संतापले

मोठी बातमी! भाजप आमदाराच्या मुलाला अटक

“मुख्यमंत्रीसाहेब माझ्या नवऱ्याचं…”, मॉरिसच्या बॉडीगार्डच्या पत्नीचं मोठं वक्तव्य

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

ओवैसींचा लोकसभेत ‘बाबरी मशिद जिंदाबाद’ चा नारा, म्हणतात…