Pune News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Loksabha Election 2024) राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. खरी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवारांची (Ajit Pawar) असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिल्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी आता नव्या नावासह निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर तसेच राज्यात घडणाऱ्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.
वागळेंवरील हल्ल्यावर महत्त्वाचे वक्तव्य-
पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे,(Nikhil Wagle) वकील असीम सरोदे तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. शरद पवार यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. पुण्यात एका व्यक्तीवर हल्ला झाला, गाडीवर हल्ला करण्यात आला. गाडी फोडण्यात आली. याचा अर्थ असा की आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ इच्छितात, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पुण्यात घडलेली घटना (Pune News) ही लोकांना पटणारी नाही. महाराष्ट्रातील लोक या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. सध्या राज्यात अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. ज्या पक्षाने हे उद्योग केले, याची दखल राज्य आणि केंद्राने घ्यायला हवी होती, ती घेतली गेली नाही, ही दुर्दैवी घटना आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, निखिल वागळे, असीम सरोदे लोकात जनमत वाढवत आहेत. सामान्य लोक त्यांना पाठींबा देत आहेत. सत्तेचा गैरवापर होत आहे, राज्यकर्ते त्यांच्या वरिष्ठच्या आशीर्वादने सगळं घडतंय हे चिंताजनक असल्याची टीका त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचं चिन्ह गेलं त्यावर…
राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याने त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. पहिली निवडणूक आम्ही बैल जोडी या चिन्हावर लढलो. नंतर चरखा, हरणावर लढलो. त्यानंतर घड्याळ हे चिन्ह आम्हाला मिळालं. लोकांच्या दृष्टीने कार्यक्रम, विचार महत्वाचे असते. चिन्ह हे मर्यादित काळासाठी उपयोगी असतं, असं ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने (Election Commission ) दिलेला निकाल आश्चर्यकारक आहे. आमचा पक्ष दुसऱ्याला दिला, ज्यांनी या पक्षाची उभारणी केली त्यांचा पक्ष काढून घेतला आणि दुसऱ्याला देण्यात आला, असं या देशात कधी घडलं नव्हतं. तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं. माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार?-
खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या ताब्यात गेल्याने बारामती लोकसभेच्या (Baramati Loksabha) जागेवरुन मोठी चर्चा सुरु झाली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवारांकडून उमेदवार दिला जाणार आहे, त्यामुळे या जागेवरुन स्वतः शरद पवार उभे राहणार असल्याची चर्चा होती. याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सरळ नकार दिला आहे. “मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. भावनिक बोलण्याचं कारण नाही. बारामतीकर साधे सरळ आहेत, इतके वर्षे मी त्यांची प्रतिष्ठा वाढवली. बारामतीकर योग्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
News Title: Pune News Baramati Loksabha Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्रातून दणका, ‘या’ दोन प्रकरणांमुळे झापलं!
धनजंय मुंडेंवर अजित पवारांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी, सुनील तटकरेंनी केली मोठी घोषणा
मोठी बातमी! बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर शाईफेक, नेमकं काय?