पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण!, म्हाडाकडून 1 हजार 700 घरांबाबत महत्त्वाची घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. त्याआधी म्हाडा (MHADA) पुणे विभागाकडून 1 हजार 700 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 20 टक्के योजनेंतर्गत ही सोडत जाहीर झाली आहे.

म्हाडाकडून 1 हजार 700 घरांबाबत महत्त्वाची घोषणा

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हाडाच्या घरांसाठी सोडत प्रक्रिया सुरू करण्याचे म्हाडाचे (MHADA) नियोजन आहे. दरम्यान आचारसंहितेच्या कालावधीमध्ये अर्ज मागवले जातील. त्यानंतर सोडत केली जाईल.

पुणे शहरात सर्वसामान्यांना घरे देण्यासाठी म्हाडाकडे स्वत:च्या मालकीच्या जागा शिल्लक नाही. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील जागा मिळवण्याचा प्रयत्न म्हाडाकडून सुरू आहे.

MHADA कोकण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला

आता सर्वसामान्य नागरिक तसंच कोकणवासीयांच्या घराचं स्वप्न साक्षात उतरणार आहे. म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.

गेल्या तीन वेळा तारीख घोषित करुन ही सोडत रखडलेली होती. कुठल्या ना कुठल्या कारणाने ही सोडत पुढे ढकलल्या जात होती. मात्र आता कोकणातील तब्बल 5 हजार 311 घरांसाठी 24 फेब्रुवारी 2024 ला सोडत ठाण्यात काढण्यात येणार आहे.

दरम्यान, नवरा बायको दोघांचीही चांगली नोकरी आणि करिअरमध्ये यशाची पायरी तरीदेखली गगनचुंबी इमारतीमध्ये घर घेणे हे प्रत्येकाला शक्य नसतं. अशात सरकार तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको (Cidco) या हाऊसिंग संस्थांची स्थापना केली आहे. या संस्थेतून सर्वसामान्य लोकांना त्यांच हक्काच आणि सुरक्षित असं छत मिळावं म्हणून गृहसंकुल शहरा शहरामध्ये उभ्या केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढणार?, शरद पवारांनी केली मोठी घोषणा

पुण्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्रातून दणका, ‘या’ दोन प्रकरणांमुळे झापलं!

धनजंय मुंडेंवर अजित पवारांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी, सुनील तटकरेंनी केली मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर शाईफेक, नेमकं काय?

सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, शिवप्रेमी संतापले