आता कपिल देव करणार शेती!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात खरेदी केली शेतजमीन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kapil Dev | गेल्या काही वर्षांमध्ये नेते, खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री हे मुंबईच्या बाहेर आपल्या हक्काचा श्वास शोधण्यासाठी येत आहेत. मुंबईच्या जवळच त्यांचं फार्म हाऊस असतं. याचा त्यांना अधिक फायदा होतो. मुंबईसारख्या शहरामध्ये सर्वकाही करता येईल मात्र शेती ही मुंबईच्या बाहेरील निमशहरीकरण असणाऱ्या भागात निसर्गाच्या सानिध्यात करता येते. यामुळे आता अनेकजण जमीन घेत शेती करताना दिसत आहेत. अशातच आता टीम इंडिया क्रिकेटचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी देखील कर्जतमध्ये शेतजमीन विकत घेतली असून ते शेती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बॉलिवूडकर, मराठी चित्रपटसृष्टी, इतर नेत्यांना मुंबईच्या बाहेरील निमशहरीकरण आणि ग्रामीण भागात येण्याची ओढ लागली आहे. ते सतत आपला मोकळा श्वास शोधण्यासाठी येत असतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरूख खानच्या मुलगी सुहाना खानने शेतजमीन विकत घेतली. तसेच बॉलिवूडचा दबंग अर्थातच सलमान खान याचं देखील मुंबईच्या बाहेर पनवेल ग्रामीण भागामध्ये फार्म हाऊस आहे आणि लॉकडाऊनमध्ये तो देखील शेती करताना दिसत होता.

कपिल देव शेती करणार

दरम्यान आता कपिल देव यांनी देखील मुंबईच्या बाहेर निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या नेरळ येथे तब्बल 16 एकर शेतजमीन विकत घेतली आहे. शेतीतून मिळणारं अन्नधान्य भाजीपाला याची गुणवत्ता ही विक्री केलेल्या वस्तुंसारखी नसते यामध्ये मोठा फरक असतो. म्हणून आता व्हिआयपी मंडळीही शेता करताना दिसत आहेत. याच कर्जतसारख्या नयनरम्य वातावरणामध्ये अनेकांच्या शेतजमीनी तसेच फार्म हाऊस आहेत.

कपिल देव यांनी आपल्या देशासाठी 1983 चा विश्वचषक जिंकून दिला होता. आता ते जमीनीच्या व्यवहारासाठी नेरळमध्ये आले असता अनेकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तालुक्यातील मोग्रज गावाच्या पायथ्याची शेतमीन घेतली आहे. ही शेतजमीन तुळशीराम गायकर यांची असून कपिल देव आणि तुळशीराम गायकर यांच्यामध्ये या जमिनीबाबत व्यवहार झाला.

नेरळ येथील सहनिबंधक कार्यालय येथे प्रभारी दोन येथे प्रभारी सहनिबंधक मंगेश चौधरी यांनी खरेदी विक्रीचा व्यवहार नोंदवून घेतला आहे. यासाठी कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होतीअशी माहिती आता समोर आली आहे.

कर्जत ‘फार्म हाऊस’चा तालुका

कर्जतमध्ये अनेक अभिनेते, नेते, यांचे फार्म हाऊस आहेत. अभिनेते जमीन विकत घेतात आणि त्याठिकाणी फार्म हाऊस बांधतात. इतर जमीन शेतीसाठी राखीव असते, म्हणून त्याला फार्म हाऊस असं म्हटलं जातं. फार्म हाऊसचा तालुका म्हणून कर्जतला ओळखलं जातं.

News Title – Kapil dev get farm at neral karjat

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढणार?, शरद पवारांनी केली मोठी घोषणा

पुण्यातील भाजपच्या नेत्यांना केंद्रातून दणका, ‘या’ दोन प्रकरणांमुळे झापलं!

धनजंय मुंडेंवर अजित पवारांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी, सुनील तटकरेंनी केली मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर शाईफेक, नेमकं काय?

सिंहगडावर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार, शिवप्रेमी संतापले