संपादक झाले रॅपर!, उमेश कुमावत यांच्या “थक गया मै साला” गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Umesh Kumawat | एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात काम करणारी असली तरीही त्या व्यक्तीस वेगवेगळे छंद असतात. काही पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस छान गाणं गातात, लिहितात. सर्वांकडे वेगवेगळं काही ना काही दैवी असतं, कोणतीही कला रंग, रूप, दिसणं, असणं पाहत नाही. तर ते तुमच्या मेंदूतून छंदातून आलेलं असतं. टीव्ही 9 मराठी या माध्यमाचे संपादक उमेश कुमावत (Umesh kumawat) आपल्या संपादकपदाची धुरा सांभाळत रॅपही करतात. ऐकूण चकीत झालात ना?, पण हे खरं आहे.

नोकरी हे एक पोट भागवण्याचं साधन असतं. अनेकदा विविध कौशल्यं तसेच आपल्यात लपलेलं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी नोकरीची आवश्यकता नसते. आपल्या देशामध्ये रॅप करून हीट झालेली अनेक मंडळी आहेत. मात्र एक पत्रकार व्यक्ती कसं काय रॅप करेल बरं?, असा अनेकांना प्रश्न पडला असेल. ‘थक गया मै साला’ (#TGMS) असं उमेश कुमावत यांच्या रॅप साँगचं नाव आहे. हे रॅप स्वत: संपादक उमेश कुमावत (Umesh Kumawat) यांनी लिहिलेलं आहे. त्यांची पत्नी हिना कुमावत यांनी या गाण्याला प्रोड्यूस केलं आहे. Umesh Kumawat या युट्यूब चॅनेलवर तुम्ही हे गाणं पाहू शकता.

युवकांवर आधारित ‘थक गया मै साला’-

थक गया मै साला या रॅपला #TGMS असा हॅशटॅग दिला आहे. या रॅपच्या माध्यमातून युवकांच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. सध्या परिस्थितीमध्ये गरम रक्त असलेल्या युवकांच्या अनुभवांवरून या रॅपची निर्मिती करण्यात आली आहे. वॅलेंटाईन डे च्या आधी हे गाणं रिलीज करण्यात आलं असून हे ब्रेकअप साँग सुद्धा आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक- 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाण्याची लाँचिंग करताना उमेश कुमावत यांचं कौतुक केलं आहे. “बातमीदारी करताना आपला छंद जोपासला पाहिजे. संपादकपदाची जबाबदारी सांभाळत छंद जोपासला. त्यात त्यांनी गाणे लिहिले, अभिनयही केला आहे आणि गायकही तेच आहेत. मी उमेश यांचं अभिनंदन करतो आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो”, असं फडणवीस म्हणाले.

गाण्याबद्दल उमेश कुमावत काय म्हणाले?

उमेश कुमावत यांनी आपल्या गाण्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. “गेली 25 वर्षांपासून गाणं करण्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं आहे. तसं हे गाणं येण्यासाठी खूपच उशिर झाला. मात्र या गाण्याच्या निमित्तानं गाणं करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. हे गाणं आल्यानंतर संगीत क्षेत्रातील महत्त्वकांक्षेला सुरूवात झाली आहे”, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

उमेश कुमावत यांनी केलेल्या थक गया मैं साला या गाण्यावर सध्या लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. केवळ 2 तासांमध्ये या गाण्याला तब्बल 3 हजार लाईक्स आल्या आहेत. गाणे जोरदार असल्याच्या प्रतिक्रिया युजर्सने दिल्या आहेत.

News Title – Umesh kumawat Thak gaya mai sala news song

महत्त्वाच्या बातम्या

तो म्हणाला, भेटायला ये नाहीतर जीव देईन; नंतर कारमध्ये घालून… धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं!

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ‘इतक्या’ कोटींवर पोहोचली, आकडेवारी समोर

‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!

आता कपिल देव करणार शेती!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात खरेदी केली शेतजमीन

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण!, म्हाडाकडून 1 हजार 700 घरांबाबत महत्त्वाची घोषणा