जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, या कारणामुळे झाला मृत्यू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Junner News | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके (Vallabh Benke Death News) यांचं निधन झालं आहे. बेनके हे जुन्नरचे आमदार होते. आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 1985 ते 2009 या काळात चार वेळा त्यांनी जुन्नरचे प्रतिनिधीत्व केले. कुशल संघटक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते असा त्यांना लौकीक होता.

आजारी असल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर उपचारादरम्यान रविवारी वल्लभ बेनके यांचं निधन झालं. वल्लभ बेनके यांच्या निधनाने जुन्नर परिसरात शोककळा पसरली आहे.

शरद पवार यांचे विश्वासू सहकारी-

जुन्नरचे सध्याचे आमदार अतुल बेनके (MLA Atul Benke) यांचे वल्लभ बेनके हे वडील होते. राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नरचे तालुक्यात वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्पष्ट वक्तेपणा, धडाकेबाज नेता अशी वल्लभ बेनके यांची ओळख होती. शरद पवारांचे (Sharad Pawar) विश्वासू सहकारी म्हणूनही वल्लभ बेनकेंनी काम केलं आहे.

आमदार पदाशिवाय कृष्णा खोरे महामंडळासारख्या विविध पदांवर देखील वल्लभ बेनके यांनी काम केलं आहे.

शरद पवारांने घेतली होती भेट-

महिन्यापूर्वीच शरद पवार यांनी जुन्नर (Junner News) दौऱ्यावर असताना वल्लभ बेनकेंची भेट घेतली होती आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

दरम्यान, वल्लभ बेनके यांच्यानंतर त्यांचे पूत्र अतुल बेनके जुन्नरच्या राजकारणात महत्त्वाचा चेहरा ठरले आहेत. सध्या ते जुन्नरचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

News Title: Junner News Former MLA Vallabh Benke Death

महत्त्वाच्या बातम्या-

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ‘इतक्या’ कोटींवर पोहोचली, आकडेवारी समोर

‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!

आता कपिल देव करणार शेती!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात खरेदी केली शेतजमीन

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण!, म्हाडाकडून 1 हजार 700 घरांबाबत महत्त्वाची घोषणा