पुन्हा ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! कांगारूंनी जिंकला वर्ल्ड कप; पराभवानंतर भारतीय कर्णधार भावूक

U19 World Cup Final | पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने बलाढ्य भारताला मोठा धक्का देत विश्वचषक उंचावला. भारताच्या अंडर-19 संघाला आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकता आला नाही. संघाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी होती मात्र खराब फलंदाजीमुळे ते होऊ शकले नाही. उदय सहारनच्या नेतृत्वाखाली संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली पण ऑस्ट्रेलियाने विजेतेपद जिंकून पुन्हा एकदा भारताच्या तोंडचा घास पळवला.

आयसीसी अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरजस सिंगच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने 7 बाद 253 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ केवळ 174 धावांपर्यंत मजल मारू शकला अन् टीम इंडियाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

पुन्हा ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’!

मागील वर्षी पार पडलेल्या वन डे विश्वचषकात देखील असेच काहीसे झाले. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. अंडर-19 विश्वचषकात देखील असेच पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक खेळवला गेला. भारताने उपांत्य सामन्यात यजमानांचा पराभव करून फायनलचे तिकिट मिळवले होते.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून महाली बियर्डमन आणि राफे मॅकमिलनने प्रत्येकी तीन तर कॅलम विडलरने दोन गडी बाद केले. या तिघांच्या घातक गोलंदाजीमुळेच या सामन्यात भारत बॅकफूटवर गेला. सुरुवातीची विकेट गमावल्यानंतर संघाला सावरता आले नाही. हा सामना 79 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा चॅम्पियन बनला.

 

U19 World Cup Final भारताचा पराभव

सामन्यानंतर भारतीय कर्णधार उदय सहारन म्हणाला की, मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान आहे, ते खरोखरच चांगले खेळले. संपूर्ण स्पर्धेत प्रत्येकाने जबरदस्त लढाईची भावना दाखवली. आज आम्ही चांगले फटके खेळण्यात थोडी घाई दाखवली, मैदानावर वेळ घालवला नाही. आम्ही तयारी केली होती पण योजना नीट अमलात आणू न शकल्याने पराभव स्वीकारावा लागला.

तसेच आम्हाला या स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळाले, क्रीडा कर्मचाऱ्यांकडून खूप काही शिकायला मिळाले आणि सामन्यादरम्यानही खूप काही शिकण्याची संधी मिळाली. आम्ही असेच शिकत राहू आणि भविष्यात आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करू, असेही भारतीय कर्णधाराने सांगितले.

News Title- Australia has won the World Cup by defeating Team India by 79 runs in the U19 World Cup Final

महत्त्वाच्या बातम्या –

जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, या कारणामुळे झाला मृत्यू

तो म्हणाला, भेटायला ये नाहीतर जीव देईन; नंतर कारमध्ये घालून… धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं!

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ‘इतक्या’ कोटींवर पोहोचली, आकडेवारी समोर

संपादक झाले रॅपर!, उमेश कुमावत यांच्या “थक गया मै साला” गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ

‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!