“रूग्णालयाला 2 कोटी दान कर नाहीतर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करेन”, पूनमच्या अडचणी वाढल्या

Poonam Pandey | बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या वादग्रस्त स्टंट्समुळे तिला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस पूनमच्या अडचणी वाढत असल्याचे दिसते. आता आणखी एका व्यक्तीने पूनमच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याबद्दल तिच्याविरोधात आवाज उठवला आहे. रिॲलिटी शो फेम फैजान अन्सारी याने उत्तर प्रदेशातील कानपूर पोलीस आयुक्तांना अर्ज दिला आहे. अर्जात पूनम पांडेला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आपल्या वादग्रस्त स्टंट्समुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेच्या सोशल मीडिया टीमने काही दिवसांपूर्वी पूनमच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट टाकून पूनम पांडेचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने झाल्याची माहिती दिली होती. या वृत्तानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली अन् अनेकांनी पूनमला श्रद्धांजली वाहिली.

पूनम वादाच्या भोवऱ्यात

पण, पूनमने स्वतः ही खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवली होती. यामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी पूनमला लक्ष्य केले. खरं तर पूनमचे पार्थिव​​ कानपूरला पाठवण्यात आले आहे, अशी देखील अफवा पसरवण्यात आली होती. मात्र, नंतर पूनम पांडेने व्हिडीओ जारी केला आणि सांगितले की, तिने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती.

आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. रिॲलिटी शो डेटिंग बाजी फेम फैजान अन्सारीने पूनम पांडे आणि पती सॅम यांच्याविरोधात कानपूर पोलिसांना अर्ज दिला आहे. खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी पूनमला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Poonam Pandey च्या अडचणी वाढल्या

पूनम पांडेच्या या स्टंटला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी चुकीचे म्हटले आहे. फैजानने सांगितले की, पूनमच्या या खोट्या कृतीमुळे तो खूप व्यथित झाला आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पूनमने हे केले आहे. पूनमने चूक मान्य करून चिल्ड्रन कॅन्सर हॉस्पिटलला 2 कोटी रुपये दान करावे.

तसेच पूनमने 2 कोटी दान न केल्यास तिच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करू, असेही फैजानने म्हटले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पूनमच्या बाजूने अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. पूनमने सातत्याने मी सर्वकाही जनजागृतीसाठी केले असल्याचा दावा केला आहे.

News Title- Poonam Pandey threatened with Rs 100 crore defamation suit for spreading fake news of death
महत्त्वाच्या बातम्या –

गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारांचा हैदोस!, 48 तासात 3 हत्या, तर गेल्या 7 दिवसात 7 हत्या!

पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल, देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती

पुन्हा ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! कांगारूंनी जिंकला वर्ल्ड कप; पराभवानंतर भारतीय कर्णधार भावूक

जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन, या कारणामुळे झाला मृत्यू

तो म्हणाला, भेटायला ये नाहीतर जीव देईन; नंतर कारमध्ये घालून… धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं!