Sania Mirza | पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा हे विभक्त झाले आहेत. दोघांनी आपले 12 वर्षांचे नाते तोडले असून मलिकने वेगळा संसार थाटला आहे. त्याने पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया माध्यमांपासून दूर राहिली. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय दिसली. आता घटस्फोटानंतर प्रथमच टेनिस स्टार स्पॉट झाली आहे. तिने ग्रँड स्लॅम विजेता आणि तिचा माजी सहकारी रोहन बोपन्नाचे तोंडभरून कौतुक केले.
सानिया नुकतीच एका पार्टीत दिसली जिथे ती ग्लॅमरस लूकमध्ये पोहोचली होती. सानियाला पाहताच पापाराझी देखील फोटो क्लिक करण्यासाठी धावले. वन पीस रेड ड्रेसमध्ये सानिया खूपच सुंदर दिसत होती. घटस्फोटानंतर सानिया जिथे दिसली ती पार्टी रोहन बोपन्नाने आयोजित केली होती. रोहन नुकताच ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम खेळला. यानंतर बोपन्ना एटीपी क्रमवारीत नंबर वन बनला.
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट
रोहन बोपन्नाच्या पार्टीत सानिया मिर्झा आल्याचे पाहून पापाराझींनी तिझी विचारपूस केली. कॅमेरामॅनने सानियाला फोटोसाठी तयार केले आणि काही सूचना केल्या, ज्यावरून सानियाने त्यांची फिरकी घेतली. भारतीय टेनिस स्टार सानिया पापाराझींना सांगताना दिसली की, तुम्ही लोक किती सूचना देता. मात्र यानंतर ती हसायला लागली.
रोहन बोपन्नाच्या पार्टीतून परतल्यानंतर सानिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत सानिया आणि रोहन बोपन्ना पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोत दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. अलीकडेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रोहन बोपन्नाने ऐतिहासिक कामगिरी केली. पुरूष दुहेरीत त्याने ग्रँड स्लॅम जिंकले.
Indian tennis star Sania mirza arrives for Rohan Bopanna bash hosted in honour of his grand Slam victory.#saniamirza pic.twitter.com/uuLiGRS5FG
— Kavya Vaghani (@kavya_vaghani_) February 10, 2024
Sania Mirza कडून रोहनचे अभिनंदन
सानियाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 25 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्तरावर मिश्र दुहेरीत खेळणाऱ्या दोन मुलांना कोणीतरी सांगितले होते की ते दोघेही एक दिवस जगात पहिल्या क्रमांकावर असतील. मग आम्हाला वाटले की हा विनोद आहे. त्यावेळीही आम्ही फोटोत दिसतो तसेच हसत होतो. अभिनंदन रोहन.
43 वर्षीय रोहन बोपन्ना वाढत्या वयासोबत चमकदार कामगिरी करत आहे. त्याने नुकतेच मॅथ्यू एबडॉनसोबत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ग्रँड स्लॅम जिंकणारा बोपन्ना हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.
View this post on Instagram
News Title- Indian tennis star Sania Mirza spotted for the first time after her divorce with Shoaib Malik, attended Rohan Bopanna’s party
महत्त्वाच्या बातम्या –
माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या झाली, आमची बदनामी तात्काळ थांबवा; विनोद घोसाळकरांचे आवाहन
“रूग्णालयाला 2 कोटी दान कर नाहीतर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करेन”, पूनमच्या अडचणी वाढल्या
गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारांचा हैदोस!, 48 तासात 3 हत्या, तर गेल्या 7 दिवसात 7 हत्या!
पुणे-नाशिक रेल्वे मार्गात मोठा बदल, देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती