Pune news | गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये शरद मोहोळ, अभिजीत घोसाळकर, महेश गायकवाड सारख्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता अशातच यामध्ये आणखी एका घटनेनं उडी घेतली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला धमकावणारा आरोपी आता ससून रूग्णालयातून पोलिसांना गुंगारा देऊन पळाला आहे. मार्शल लुईस लीलाकर असं त्याचं नाव आहे. (Pune news)
मार्शल लुईस लीलाकर पोलिसांच्या नाकाखालून छू…
शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला मार्शल लुईस लीलाकर यांनी धमकी दिल्यानं त्या पुणे पोलिसांंनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. स्वाती मोहोळला सोशल मीडियावर कमेंट करत आणि रिल्सवर धमकी दिली. यामुळे पुणे पोलिसांनी (Pune news) त्याला ताब्यात घेतलं आणि तो 11 फेब्रुवारी रोजी सकाळी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला आहे.
पोलिसांनी लीलाकरला ताब्यात घेतलं आपल्या पोटात दुखतंय असं सांगून येरवड्यातून त्याला ससून रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गोला आहे. या घटनेनं पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण याआधी ललित पाटील या प्रकरणातही पोलिसांना अशा प्रकारच्या घटनेला सामोरं जावं लागलं आहे.
लीलाकरचा सध्या शोध सुरू असून त्यामागे 8 पथके लावण्यात आली आहेत. याआधी काही महिन्यांपूर्वी ललित पाटील प्रकरणातही असंच काहीसं घडलं होतं. ललित पाटीलचा एक्सरे काढण्यासाठी ललित पाटीलला पुण्याच्या ससून रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तो देखील पोलिसांच्या नाकाखालून कधी पळून गेला याची पोलिसांना खबर लागली नाही. यावेळी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
ललित पाटील हा ससून रूग्णालयामध्ये राहून ड्रग्ज रॅकेट चालवत होता. मात्र याची पोलिसांना कानोकान खबर नव्हती. त्याचे ससून रूग्णालयाचे फोटो आल्यानंतर ड्रग्ज प्रकरण बाहेर आल्यानं प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
स्वाती मोहोळ अडचणीत
शरद मोहोळला काही दिवसांआधी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळला काही दिवसांपासून धमक्या येत आहेत. यामुळे स्वाती मोहोळ यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं होतं. सकाळी लीलाकर ससूनमधून पळून गेल्यानं स्वाती मोहोळ यांच्या चिंतेत वाढ झाली असून लीलाकरला ताब्यात घेणं हे पुणे पोलिसांना एक आव्हान आहे.
News Title – pune news marshal louise lilakar escape from sasoon hospital
महत्त्वाच्या बातम्या
तो म्हणाला, भेटायला ये नाहीतर जीव देईन; नंतर कारमध्ये घालून… धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं!
लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ‘इतक्या’ कोटींवर पोहोचली, आकडेवारी समोर
संपादक झाले रॅपर!, उमेश कुमावत यांच्या “थक गया मै साला” गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ
‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!
आता कपिल देव करणार शेती!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात खरेदी केली शेतजमीन