जड्डूच्या घरात कौटुंबिक कलह! सासऱ्यांबद्दल प्रश्न विचारताच आमदार रिवाबाला राग अनावर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravindra Jadeja | मागील काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ते त्यांच्या मुलाला बरेच दिवस भेटले नाहीत. रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्धसिंह जडेजा यांचे हे विधान सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाले आणि त्यानंतर लोकांमध्ये या विषयावर चर्चा जोरात सुरू झाली. आता रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जड्डूच्या घरात आधीपासूनच राजकीय कलह सुरू असून आता त्यात कौटुंबिक कलहाची भर पडल्याचे दिसते. रवींद्रच्या वडिलांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, रिवाबा आणि रवींद्र यांचे लग्न झाले नसते तर खूप बरे झाले असते. रिवाबाने माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नेले असून तिला फक्त पैसा आहे. मी आता त्यांच्यापासून लांब राहतो ते जामनगर येथे बंगल्यात राहतात.

आमदार रिवाबा जडेजाला राग अनावर

खरं तर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही आमदार आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ती जामनगर उत्तर येथून भाजपच्या तिकिटावर निवडून आली. अनेकदा जड्डूला आणि टीम इंडियाला चीअर करताना रिवाबा प्रेक्षक गॅलरीत दिसली आहे. पण, रिवाबाला तिच्या सासऱ्यांबद्दल प्रश्न केला असता तिचा पारा चढला. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना तिने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र जडेजाच्या वडिलांची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होताच रवींद्र जडेजानेही त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो म्हणाला की, या सर्व गोष्टी निरर्थक आणि खोट्या आहेत. त्या एकतर्फी टिप्पण्या आहेत ज्या मी नाकारतो. माझ्या पत्नीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. मलाही खूप काही सांगायचे आहे पण त्या गोष्टी मी जाहीरपणे उघड न करणे हेच बरे होईल.

Ravindra Jadeja च्या घरात कलह

एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने भाजप आमदार रिवाबा जडेजा यांना त्यांच्या कौटुंबिक कलहाबाबत प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून रिवाबा जडेजा संतापली. पत्रकाराला सुनावताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांचा दाखला दिला आणि अशा प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा असे सांगितले.

पत्रकाराच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देताना रिवाबाने पत्रकारांना सार्वजनिक क्षेत्रात अशा वैयक्तिक प्रश्नांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच आज आपण इथे का जमलो आहोत? पण तुम्हाला याबद्दलच जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता. कोणत्याही ठिकाणी काहीही विचारणे हे योग्य नाही, असेही तिने सांगितले.

News Title- BJP MLA Rivaba Jadeja got angry at the journalist’s question
महत्त्वाच्या बातम्या –

राज्याच्या ‘या’ भागात गारपिटीसह जोराचा पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

“केवळ एका राज्यसभेच्या भाकर तुकड्यासाठी…”; शरद पवारांच्या शिलेदारानं अशोक चव्हाणांना सुनावलं

‘…ती फक्त अफवा होती’; श्रीदेवीबाबत बोनी कपूर यांचा मोठा खुलासा

“कायम मलाच …”; Abhishek Bachchan कडून सर्वात मोठा खुलासा

“काँग्रेसने सगळं काही दिलेले नेते…”; नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर टीका