“कायम मलाच …”; Abhishek Bachchan कडून सर्वात मोठा खुलासा

abhishek bachchan

Abhishek Bachchan | बाॅलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून चर्चेत असणारे अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाबदल बोलंल जात होतं. शिवाय ऐश्वर्याने देखील अभिनेते बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांना आपल्या अधिकृत अकाउंटवरुन अनफॉलो केल्याचं म्हटलं होतं. अभिषेकने (Abhishek Bachchan) त्याच्या आणि ऐश्वर्याच्या भांडणाबदल मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाला अभिषेक?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना अभिषेक (Abhishek Bachchan) म्हणाला की, कधीही माझ्यात आणि ऐश्वर्यामध्ये वाद झाले तर मलाच माफी मागावी लागते. एवढंच नाहीतर भांडण झाल्यावर फक्त मीच नाही तर जवळपास सर्वच पुरूष असे करत असतील. मात्र यामध्ये एक नियम आहे की, आमचं कितीही भांडणं झाली किंवा वाद झाले तरीही ते वाद मिटवल्याशिवाय झोपायचं नाही. पुढे तो म्हणाला की, आमच्या भांडणाची रोज वेगवेगळी कारणं असतात. मात्र त्याशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नाही.

घटस्फोट होणार का?

अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा खरोखर घटस्फोट होणार का? असा प्रश्न पडत आहे. दरम्यान, या दोघांना देखील घटस्फोटाबाबत कायम प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र अजूनही ऐश्वर्या आणि अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी याबाबत भाष्य केलेलं नाहीये. ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंब सर्वजण एकत्रित मिळून अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत असतात.

ऐश्वर्याची पोस्ट चर्चेत

काही दिवसापूर्वी अभिषेक बच्चनचा वाढदिवस पार पडला. यावेळी पत्नी ऐश्वर्याने दोन फोटो शेअर केले होते. यामध्ये पहिल्या फोटोत ऐश्वर्यासोबत अभिषेक आणि मुलगी आराध्याही दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत ती म्हणाली की “तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला खूप आनंद, प्रेम, शांती आणि उत्तम आरोग्य लाभो. खूप सारे प्रेम.” या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

News Title : abhishek bachchan reveals truth about aishwarya rai

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोणी आपल्या वडिलांना घरातून बाहेर काढतं का?’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल

“आमिर खानची पत्नी म्हणून राहिले असते तर..”, Kiran Rao चं धक्कादायक वक्तव्य

“माझ्यासोबत राजकारणात…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा राजीनामा, भाजपात जाणार?

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .