‘…ती फक्त अफवा होती’; श्रीदेवीबाबत बोनी कपूर यांचा मोठा खुलासा

Sridevi | बाॅलिवूडमध्ये 80 आणि 90 चं दशक गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवीने आपल्या अभिनयाने आणि सौंदऱ्याने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं होतं. त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी श्रीदेवींचा (Sridevi) चाहतावर्ग कायम उत्साही असायचा. आज श्रीदेवी जरी जिवंत नसल्या तरी मात्र, त्यांचे चाहते आजही त्यांचे चित्रपट आवडीने पाहतात. श्रीदेवी आपल्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच खासगी लाईफमुळे देखील चर्चेत होत्या. दरम्यान दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी देखील लग्नाआधी शारीरिक संबंध, वन नाईट स्टँड आणि कॅज्युअल सेक्सबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. शिवाय त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

काय म्हणाल्या होत्या श्रीदेवी?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी (Sridevi) प्रेम आणि शाररीक संबंधावर भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, ‘ सेक्स ही गोष्ट माझ्यासाठी कधीच महत्त्वाची नव्हती आणि नसेल. मी माझ्या आयुष्यात प्रेमाला अधिक महत्त्व दिलं आहे. रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुण-तरुणींना एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे.’ एवढंच नाही, आजच्या काळातील मुलांसाठी शारीरिक संबंध गरजेचे आहेत, पण त्यांमध्ये प्रेम असतं का? यावर देखील श्रीदेवी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं.

पुढे त्या म्हणाल्या होत्या की, ‘आजच्या काळात लग्नाआधी शारीरिक संबंध ट्रेंड झालं आहे. रिलेशनशिपमध्ये प्रेमाला अधिक महत्त्व असतं. एकमेकांचा आदर करायला हवा.’ सांगायचं झालं तर, श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या. अशा चर्चा अनेकदा रंगल्या. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा होत्या, असं वक्तव्य पती बोनी कपूर यांनी केलं.

काय म्हणाले बोनी कपूर?

दरम्यान, या नंतर एका मुलाखतीमध्ये बोलत असताना बोनी कपूर म्हणाले होते की, ‘जान्हवी हिचा जन्म श्रीदेवी आणि माझ्या लग्नानंतर झाला होता.’ एवढंच नाही तर, श्रीदेवी प्रचंड धार्मिक होत्या, जेव्हा बोनी कपूर अडचणीत असायचे, तेव्हा श्रीदेवी अनवाणी सिद्धिविनायक मंदिरात जायच्या, असं देखील बोनी कपूर म्हणाले होते.

श्रीदेवी यांनी बाॅलिवूडमधी अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सोशल मीडियावर देखील श्रीदेवींची जबरदस्त फॅन फाॅलोइंग होती. तरुण आणि तरुणी आज देखील त्यांचे चित्रपट आवडीने बघतात. आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात आहेत.

News Title : bonny kapooor talks about the virginity of sridevi

महत्त्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने काँग्रेसचं टेंशन आणखी वाढलं, म्हणाले…

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या सोबतच्या भांडणाबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला..

‘कोणी आपल्या वडिलांना घरातून बाहेर काढतं का?’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल

“आमिर खानची पत्नी म्हणून राहिले असते तर..”, Kiran Rao चं धक्कादायक वक्तव्य

“माझ्यासोबत राजकारणात…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य