देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने काँग्रेसचं टेंशन आणखी वाढलं, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadanvis | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्याचे पक्षप्रवेश करणं हे फार काही नवं नाही. शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे. आता राज्यातील काँग्रेस पक्षाची तिच स्थिती पाहायाला मिळत आहे. काँग्रसचे नेते सध्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यावर गोप्यस्फोट केला आहे.

राज्यामध्ये भाजपने पक्ष फोडत विरोधकांना सत्तेत घेतलं आहे. अशातच आता काही विरोधक हे भाजपच्या वाटेवर पाहायला मिळत आहेत. अशातच आता काँग्रेस नेते अशोक चव्हण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय भूकंप झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

काही तासांपूर्वी नरीमन पॉईंट येते भाजप मुख्यालयात काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषद देखील झाली. या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. मात्र आशोक चव्हाण यांनी अजूनही भाजपमध्ये प्रवेश केला नसल्यची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

काय घडलं पत्रकार परिषदेत?

देवेंद्र फडणवीस यांना अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला होता, यावर देवेंद्र फडणवीस यांनी “हे मी आता तुमच्याकडूनच ऐकत आहे”, असं फडणवीस म्हणाले. “सध्या काँग्रेसमध्ये जे नेते आहेत. त्यांचे भाजपशी चांगला संपर्क आहे. काँग्रेस पक्षाची जी वाटचाल आहे ती पाहून जनतेच्या संपर्कात असलेले नेते भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांची काँग्रेसमध्ये गुदमर होतेय”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

“आम्ही असं फोडाफोडीचं राजकारण करत नाही. सगळ्याच पक्षातील लोकं आमच्या संपर्कात आहेत. सर्वांना वाटतं की आपण भाजपमध्ये जावं. सर्व नेत्यांची भावना आहे की आपण मोदीजींसोबत जावं, भाजपसोबत जावं अशी भावना पाहायला मिळते”.

‘आगे आगे देखो होता है क्या’ 

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता अशोक चव्हाण भाजपच्या मार्गावर असणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशोक चव्हाण यांच्या निर्णयानंतर फडणवीसांनी सध्याच्या राजकारणावर ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं भाष्य केलं आहे.

News Title – devendra fadanvis statement after ashok chavan resign

महत्त्वाच्या बातम्या

‘कोणी आपल्या वडिलांना घरातून बाहेर काढतं का?’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल

“आमिर खानची पत्नी म्हणून राहिले असते तर..”, Kiran Rao चं धक्कादायक वक्तव्य

“माझ्यासोबत राजकारणात…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा राजीनामा, भाजपात जाणार?

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर