राज्यात ऑपरेशन लोटस सुरू?; ‘या’ तारखेला मोठा राजकीय भूकंप होणार?

Ashok chavan

Ashok chavan | राज्यामध्ये अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत तर काही नेते आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात बंड करून सत्ताधारी पक्षांसोबत हातमिळवणी करताना दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं हेच झालं आहे. आता काँग्रेसचा नंबर लागतोय की काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. त्यानंतर ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मी येत्या दोन दिवसांमध्ये माझ्या आगामी राजकीय भूमिकेवर निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं.

अशोक चव्हाण यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बातचीत झाली होती. यावेळी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा असल्याची माहिती दिली आहे. येत्या 15 फेब्रुवारीला अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत इतरही काही काँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर जाण्याची चिन्हे आहेत.

येत्या 72 तासात राजकीय भूकंप

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्षाची जी परिस्थिती पाहायला मिळाली होती. पुन्हा तिच परिस्थिती राज्यातील काँग्रेस पक्षाची पाहायला मिळू शकते. कारण आता अशोक चव्हाण अमित शाहच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यामुळे येत्या 72 तासांमध्ये अशोक चव्हाण हे काँग्रेसचे काही नेते सोबत घेत बंड करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. थोडक्यात काय तर भाजप काँग्रेस पक्ष फोडण्याच्या वाटेवर प्रयत्न करेल.

काँग्रेसच्या डोकेदुखीत वाढ

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षाच्या डोकेदुखीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीला गेले आहेत. एका राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये येत्या काही तासांमध्ये मोठा ट्विस्ट घडणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आता काँग्रेसचं दुखणं आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे आता राज्यातील काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांच्या बैठकी पार पडू लागल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांच्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे

News Title – Ashok Chavan resign And on the way bjp

महत्त्वाच्या बातम्या

अशोक चव्हाणांवर भाजपकडून जमीन घोटाळ्याचे आरोप, ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने काँग्रेसचं टेंशन आणखी वाढलं, म्हणाले…

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या सोबतच्या भांडणाबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला..

‘कोणी आपल्या वडिलांना घरातून बाहेर काढतं का?’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल

“आमिर खानची पत्नी म्हणून राहिले असते तर..”, Kiran Rao चं धक्कादायक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .