“आमिर खानची पत्नी म्हणून राहिले असते तर..”, Kiran Rao चं धक्कादायक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kiran Rao | अभिनेता आमिर खान याची एक्स वाईफ किरण रावने धक्कादायक खुलासा केला आहे. काही दिवसांपुर्वीच आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आयरा खान हीचा नूपुर शिखरेसोबत विवाह झाला. या सोहळ्यात आमिरची दुसरी पत्नी किरण राव (Kiran Rao) आपला मुलगा आझादसोबत सर्व कार्यक्रमात उपस्थित होते.

किरणने आयराच्या लग्नात एक आई म्हणून सर्व भूमिका निभावल्या. लग्नात आमिर आणि किरणचा बॉन्डही चांगला दिसून आला. मात्र तिने नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. किरणने ‘अॅनिमल’ चित्रपटावरही टिप्पणी दिली होती. तेव्हा संदीप रेड्डी वांगा आणि किरण राव यांच्यात शाब्दिक चकमक दिसून आली. आता तिने आमिरसोबत घेतलेल्या घटस्फोटावर केलेल्या एका वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

किरण राव (Kiran Rao) आणि आमिर खान यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. 2022 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यांचं 16 वर्षांचं नातं आता तुटलं होतं, याचा चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. याच कारणामुळे लोक आजही किरण रावला आमिर खानची पत्नी म्हणूनच संबोधतात.

“… तर डिप्रेशनमध्ये गेली असती”

किरण रावने (Kiran Rao) नुकताच एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे. मी आता आमिरची पत्नी नसून त्याची एक्स पत्नी आहे, हे मला पुन्हा पुन्हा लोकांना आठवण करून द्यावं लागतंय, असं किरण म्हणाली आहे. किरण राव सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘लापता लेडीज’मुळे चर्चेत आहे. ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या संदर्भातच एका मुलाखतीमध्ये किरणने आमिरच्या नात्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल खुलासा केला.

“लग्नानंतर प्रत्येकाची ओळख आणि स्पेस असायला हवा आणि ही गोष्ट प्रचंड गरजेची आहे. असं मला वाटतं. प्रत्येक जण मला एक्स वाईफ किंवा आमिरच्या पत्नीच्या रुपात ओळखतो. जर मला माझ्यावर विश्वास नसता तर, फक्त पत्नी म्हणून राहिले असते. नाही तर डिप्रेशनमध्ये गेले असते. कायम आमिर याची पत्नी म्हणून राहिले असते तर, माझी काही ओळखच नसती”, असं किरण राव म्हणाली आहे. तिचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

किरण आणि आमिर यांनी घेतला घटस्फोट

किरण (Kiran Rao) आणि आमिर यांची ओळख एका चित्रपटाच्या शूट दरम्यान झाली होती. ‘लगान’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्यांना प्रेम झाले. ‘लगान’ मध्ये किरण सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. पुढे त्यांनी 2005 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र 2022 मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेत ते वेगळे झाले. मात्र अजूनही ते सोबत बऱ्याच कार्यक्रमात दिसून येतात.

News Title- Kiran Rao opens up about her relationship with Aamir

महत्त्वाच्या बातम्या –

पुणे पोलिसांच्या नाकाखालून गुन्हेगार पळाला!, शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससूनमधून फरार

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या झाली, आमची बदनामी तात्काळ थांबवा; विनोद घोसाळकरांचे आवाहन

“रूग्णालयाला 2 कोटी दान कर नाहीतर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करेन”, पूनमच्या अडचणी वाढल्या