“माझ्यासोबत राजकारणात…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

Pankaja Munde | लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. यासाठी भाजपसह सर्वच पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. अशातच भाजपकडून सध्या गाव चलो अभियान सुरु आहे. या अभियानातच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वच चकित झाले आहेत.

अभियानासाठी पंकजा मुंडे बीडच्या पौंडूळ गावात आहेत. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. ‘मला तुम्ही वाघीण म्हणालात, ‘मी वाघिणी सारखीच जगेन.’, असं गावकऱ्यांना उद्देशून पंकजा यांनी म्हटलं. याचवेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“2014 ची निवडणूक आपल्यासाठी दुर्दैवाने चांगली ठरली नाही. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर काही दिवसात ते आपल्यातून गेले. मी 2009 मध्ये राजकारणात प्रवेश केला. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असे म्हणाले. बाबा यमराजा पुढे ते अपयशी झाले. मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं सांगितलं. आपली जात केवळ वंचित आहे. त्यांच्यासाठीच संघर्ष करायचा आहे त्यांच्यासाठी काम करायचं आहे.”, असं पंकजा (Pankaja Munde) यांनी म्हटलं.

पुढे त्या म्हणाल्या की, माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला. पण मला त्याचा फायदा झाला. मला आता लोक दहापट जास्त प्रेम करतात. तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे. माझ्या मागे आता दहापट जास्त लोक आहेत, असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी मनातली सल बोलून दाखवली आहे.

उमेदवारीबाबत पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

कोणतीही निवडणूक असो माझे नाव चर्चेत असते. यात नाविन्य असं काही नाही. लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना जिथे पाहिजे तिथे मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे. अनेक वर्ष झाली मी एका पदाच्या प्रतिक्षेत आहे, असं लोकांना वाटतं.

आता आमच्यासोबत म्हणजेच भाजपसोबत अजून एक पक्ष जुडला आहे. त्यामुळे तीन पक्षाचे सरकार बनले आहे. त्यामुळे साहजिक आहे की एक प्रश्नचिन्ह बनला आहे. मला आता मतदार संघच राहिला नाहीये. त्यामुळे या चर्चा आधीही आल्या आहेत आणि आताही होत आहेत, असं पंकजा (Pankaja Munde) यांनी म्हटलं.

News Title-  Pankaja Munde big statement

महत्त्वाच्या बातम्या –

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या झाली, आमची बदनामी तात्काळ थांबवा; विनोद घोसाळकरांचे आवाहन

“रूग्णालयाला 2 कोटी दान कर नाहीतर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करेन”, पूनमच्या अडचणी वाढल्या

गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारांचा हैदोस!, 48 तासात 3 हत्या, तर गेल्या 7 दिवसात 7 हत्या!