Supriya sule | राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांची सर्वच पक्षांमध्ये जोरदारी तयारी सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा धक्कादायक निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे. यामुळे राज्यभरातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते यांनी संताप व्यक्त केला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या चिन्हाबाबत माहिती दिली आहे.
खरा राष्ट्रवादी पक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असल्याचा निवडणूक आयोगानं निर्णय दिला आहे. यामुळे शरद पवार गटातील नेते नाराज आहेत. धक्कादायक निकालाने राज्याच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चिन्ह गेलं आणि पक्षही गेला यावर आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे बारामतीत गेल्या असताना त्यांनी लोकांशी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी लोकांनी त्यांना चिन्हाबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या “की चिन्ह आणि पक्ष दोन्ही आपण लोकांपर्यंत पोहोचवू त्यांना काय घेवून जायचं आहे ते घेऊन जाऊदे.”
वकिलांनी सुप्रिया सुळे यांना चिन्हाबाबत विचारलं, चिन्ह कोणतं घ्यायचं? या प्रश्नावर सुप्रिय सुळे म्हणाल्या की, “जो तुला घ्यायचा आहे तो घे”, असं म्हणत. त्यांनी अद्यापही कोणतं चिन्ह घ्यायचं आहे यावर स्पष्टोक्ती दिली नाही. मात्र वटवृक्ष या चिन्हाची सर्वत्र चर्चा आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत अजित पवार यांचं नाव न घेता टीका केली.
अजित पवारांना जहरी सवाल
निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून माध्यमांनी विचारलं असता, त्यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. “कोणी जन्मदात्या आपल्या वडीलांना घरातून बाहेर काढतं का?” यावेळी त्यांनी अजित पवार यांचं नाव न घेता हल्ला चढवला आहे.” शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष काढून घेतला. उद्धव ठाकरे यांच्या वडीलांनी स्थापन केलेला पक्ष काढून घेतला. कोणी आपल्या वडीलांना घराबाहेर काढतं का?” असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केला आहे.
“श्रीराम आपल्या वडीलांसाठी चौदा वर्षे वनवासाला गेले होते. आपल्यावर पुरूषोत्तम श्रीरामाचे संस्कार आहेत. आज ते आपला पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन गेले आहेत. त्यांना घेऊन जाऊ द्या. काय न्यायचं आहे ते घेऊदे. आपण पक्ष उभा करू, नवीन चिन्ह पाहू, लोकांपर्यंत घेऊन जाऊ. ते माझी इमानदारी तर घेऊन जाऊ शकत नाहीत”, असं सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला खडे बोल सुनावले आहेत.
“अदृश्य शक्ती सांगेल तसं आम्ही करणार नाही”
लोक आपल्याकडे राहिली पाहिजेत, मी कोणाशीही भांडत नाही. माझा विश्वास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर आहे. जे हवंय ते देऊ मात्र दिल्लीवरून अदृश्य शक्ती सांगेल तसं आम्ही करणार नाही, आम्ही ऐकणार नाही, असा हल्ला सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
News Title – Supriya sule aggressive on ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या