“काँग्रेसने सगळं काही दिलेले नेते…”; नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nana Patole | महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काही न काही घडतं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता महाराष्ट्र काँग्रेसमध्येही फोडाफोडीचं राजकारण होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अशातच काँग्रेसमधील बड्या नेत्याने राजीनामा दिल्याने राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावरच काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole ) यांनी पहिली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

“कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता…”

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी केलेले ट्वीट आता चर्चेत आले आहे. “काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे.”, असं नाना पटोले (Nana Patole ) म्हणाले आहेत.

कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

अशोक चव्हाण BJP मध्ये जाणार?

आता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमधील अनेक चांगले नेते, हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगे आगे देखिये होता है क्या…, अशी सूचक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर अशोक चव्हाण यांना 2008 साली मुख्यमंत्रीपदाची संधीही मिळाली होती. अशोक चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव असून त्यांची नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड आहे. आता ते भाजपमध्ये जाणार काय, याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.

या पार्श्वभूमीवरच नाना पटोले यांच्यानंतर (Nana Patole) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही सूचक ट्विट केले आहे. “विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे!”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

News Title-  Nana Patole criticism of Ashok Chavan

महत्त्वाच्या बातम्या –

‘कोणी आपल्या वडिलांना घरातून बाहेर काढतं का?’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल

“आमिर खानची पत्नी म्हणून राहिले असते तर..”, Kiran Rao चं धक्कादायक वक्तव्य

“माझ्यासोबत राजकारणात…”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा राजीनामा, भाजपात जाणार?

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर