पैलवानानं गिरीश महाजनांना घेतलं खांद्यावर, राजकीय मैदानात करणार एंट्री?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay chaudhary | आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असताना सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच भाजपने राज्यातील विविध जिल्ह्यात तसेच तालुक्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने नमो स्पर्धांचे आयोजन केलं होतं. अशाचप्रकारे जळगावमधील पारनेरमध्ये ‘नमो कुस्ती महाकुंभ’चं आयोजन केलं होतं. यामध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांना मल्ल आपल्या खांद्यावर घेऊन नाचला आहे. त्या मल्लाचं नाव विजय चौधरी (Vijay chaudhary) आहे. यामुळे गिरीश महाजन यांना मल्लानं आपल्या खांद्यावर का घेतलं? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.

विजय चौधरी (Vijay chaudhary) हा मल्ल महाराष्ट्र केसरी आहे. एवढंच नाहीतर तो सध्या पुण्यामध्ये आयपीएस पदावर सक्रिय आहे. मात्र अजूनही विजय चौधरीनं कुस्तीला सोडून दिलं नाही. दरम्यान ‘नमो मोदी कुस्ती महाकुंभ’ या कुस्ती स्पर्धेसाठी अनेक स्पर्धकांच्या आणि कुस्ती चाहत्यांच्या डोळ्याचं पारणं फेडणारे कुस्त्यांचे जंगी सामने पाहायला मिळाले आहेत. यामुळे काही कुस्ती शौकीनांनी गर्दी केली होती. यावेळी सुप्रसिद्ध कुस्तीपटू आणि आयपीएस म्हणून कार्यरत असलेले विजय चौधरी यांनी या स्पर्धेत कुस्ती जिंकल्यावर गिरीश महाजन त्यांना खांद्यावर घेऊन नाचले.

पैलवान विजय चौधरीची राजकारणात एन्ट्री?

गिरीश महाजन यांना विजय चौधरीनं आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर विजय चौधरीची राजकारणात एन्ट्री होण्याबाबत जोरदार चर्चा आहे. काही प्रेक्षकांकडून विजय भाऊ यांनी राजकारणात एन्ट्री करावी. त्यानंतर काही कॅमेंट्री करणाऱ्यांनी देखील विजय भाऊ राजकारणात एन्ट्री करा असं म्हणत होते. प्रेक्षक वर्गाकडूनही विजय चौधरीबाबत राजकीय चर्चां सुरू झाल्या आहेत. दरम्यान काही महिन्यांआधी विजय चौधरी यांनी आपल्याला भाजप पक्ष आवडतो असं सांगितलं होतं.

विजय चौधरीनं प्रतिस्पर्ध्यास केलं चित

विजय चौधरी आणि प्रतिस्पर्धी मुस्ताफा खान या जम्मूच्या मल्लाला चौधरी यांनी चित केलं. मुस्ताफा हा देखील चिवट मल्ल होता. त्यांनी चौधरीविरोधात दंड थोपटले आणि शेवटपर्यंत कुस्ती निकाली लागेपर्यंत चिवट झुंज दिली. मात्र महाराष्ट्र केसरी असलेल्या विजय चौधरीनं डाव टाकत मुस्ताफाला चित केलं.

गिरीश महाजन पंचांच्या भूमिकेत

गिरीश महाजन यांनी जळगावमधील पारनेर येथे झालेल्या ‘नमो कुस्ती महाकुंभ’ या कुस्ती स्पर्धेत विजय चौधरी आणि मुस्ताफा खान यांच्या सामन्यामध्ये ते स्वत: पंचांच्या भूमिकेत होते. त्यानंतर गिरीश महाजन यांनी विजय चौधरीच्या विजयानंतर विजय चौधरीला आपल्या खांद्यावर घेऊन आनंद साजरा केला आहे.

May be an image of 6 people and crowd

अंतिम सामना सिंकंदर शेखचा होता. मागील वर्षा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणाऱ्या सिकंदर शेखनं पुन्हा एकदा पारनेरचं मैदान मारलं आहे.

News Title – Vijay chaudhary win namo kusti mahakunbh

महत्त्वाच्या बातम्या

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या झाली, आमची बदनामी तात्काळ थांबवा; विनोद घोसाळकरांचे आवाहन

“रूग्णालयाला 2 कोटी दान कर नाहीतर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करेन”, पूनमच्या अडचणी वाढल्या

गृहमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारांचा हैदोस!, 48 तासात 3 हत्या, तर गेल्या 7 दिवसात 7 हत्या!