हवामानाचा अंदाज होतोय खरा; राज्यातील ‘या’ दुष्काळीभागात पावसाचं थैमान, येलो अलर्ट जारी

Unseasonal Rain | सध्या हिवाळा ऋतू सुरू असूनही राज्यातील विदर्भामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा अंदाज देखील खरा होताना दिसत आहे. विदर्भामध्ये चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आता हवामान खात्यानं दिली आहे. विदर्भ हा अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. या ठिकाणी यंदा हिवाळ्यात पाऊस (Unseasonal Rain) पडल्यानं पिकांचं नुकसान झालं आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. यामुळे होत्याचं नव्हतं होऊन बसलं आहे. नागपूर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील माैदा, कामठी या तालुक्यामध्ये गारपिटीने जोरदार तडाखा दिला आहे. सोमवारीही अवकाळी पावसाची शक्यता (Unseasonal Rain) असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

दुष्काळी भागात पाऊस 

विदर्भ हा दुष्काळी भाग आहे. याठिकाणी बाराही महिने पाणी नसतं. मात्र येथे कापसाची शेती केली जाते. मात्र यंदा अवकाळी पावसाने विदर्भासारख्या दुष्काळी भागामध्ये धिंगाणा घातला असून मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. याचं कारण आता समोर आलं आहे. मध्य भारतात सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे विदर्भात पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलं आहे. रविवारी नागपूर जिल्ह्यामध्ये गारपिटीनं नकोसं केलं आहे. मौदा, कुहू, तालुके आणि कामठीमध्ये मोठ्या गारा पडल्या आहेत. गहू, हरभरा, मिरची, तूर आणि टोमॅटोसारख्या पिकांचे गारपिटीनं नुकसान झालं आहे.

नांदेड जिल्ह्याला पावसाचा दगाफटका

नांदेड जिल्ह्यातही पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे शेतपिकांचं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, किनवट, उमरी येथे गारपिटीनं हजेरी लावली आहे. गहू, हरभरासारख्या पिकांचं नुकसान झालं आहे. उमरी तालुक्यातील चार गावं, हिमायतनगर तालुक्यातील 13 गावं आणि किनवट तालुक्यातील धामणदरी गावामध्ये गारपिटीचा फटका बसला आहे.

हदगाव तालुक्यामध्ये लिंगापूर शिवारामध्ये काही वेळ गारपीट झाली होती. याभागात गहू, हरभरा अशी पिके घेतली जातात. या पिकांचं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.

News Update – Unseasonal Rain news update vidarbha

महत्त्वाच्या बातम्या

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

पुणे पोलिसांच्या नाकाखालून गुन्हेगार पळाला!, शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससूनमधून फरार

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर