पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार, पुण्याजवळील ‘या’ गावांमधून जाणार नवा रेल्वेमार्ग!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुणे स्थानकावरील (Pune News) वाढता ताण कमी करण्यासाठी आता एका नव्या मार्गाचा विचार केला जात आहे. तळेगाव-उरुळी असा हा मार्ग असणार आहे. हा मार्ग व्हाया चाकण-रांजणगाव असा असणार आहे. रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाला याचा ‘डीपीआर’ म्हणजेच सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही आनंददायी बातमी ठरली आहे.

चाकण आणि रांजणगाव मधील उद्योगांना मोठा फायदा

या नवीन मार्गामुळे चाकण व रांजणगाव मधील उद्योगांना मोठा लाभ होणार आहे. पुणे-लोणावळा व पुणे- दौंड या लोहमार्गावर क्षमतेपेक्षा अधिक रेल्वेगाड्या धावत असल्याने पुणे स्थानकात दाखल होणाऱ्या प्रवासी गाड्यांनाच (Pune News) फलाट उपलब्ध होत नव्हता.

यामुळे 72 प्रवासी गाड्यांना स्थानकाच्या दोन्ही होम सिग्नलवर क्रॉसिंगसाठी थांबावं लागतं. ही अडचण लक्षात घेऊन यावर एक नवीन मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांमध्येच याचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे उद्दिष्टय समोर ठेवण्यात आलं आहे.

पुणे स्थानकावरील ताण कमी होणार

नवीन तळेगाव-उरुळी हा लोहमार्ग फक्त मालगाड्यांसाठी तयार करण्यात येणार आहे. सध्याच्या स्थितीत रोज पुणे स्थानकावरून 70 ते 80 मालगाड्या येत-जात असतात. यामुळे पुणे स्थानकावर प्रचंड ताण पडत होता. यावर आता तोडगा निघाला आहे. या नवीन मार्गामुळे या सर्व मालगाड्या यावरून धावतील.

परिणामी पुणे (Pune News) स्थानकावरील ताण कमी होणार आहे. यामुळे प्रवासी गाड्यांनाही मार्गात थांबावं लागणार नाही, तसेच मालगाड्यांनाही सेक्शनमध्ये थांबावं लागणार नाहीये. मुंबई-चेन्नई या मार्गावर प्रवासी रेल्वेगाड्यांसह मालगाड्यांची वाहतूक अधिक असते. याचा विचार करूनच तळेगाव-उरुळी हा नवीन प्रकल्प आणण्याचा विचार केला गेला आहे.

या पार्श्वभूमीवरच पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी मोठी माहिती दिली आहे. “तळेगाव-उरुळी या नवीन मार्गासाठी रेल्वे बोर्डाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच मार्गिकेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होईल. याचा डीपीआर पूर्ण झाल्यावर तो रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल. याच्या मंजूरीबाबत नंतर बोर्ड निर्णय घेईल.”, असे इंदू दुबे यांनी म्हटलं आहे.

News Title- Pune News Talegaon-Uruli new railway will be constructed

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

पुणे पोलिसांच्या नाकाखालून गुन्हेगार पळाला!, शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससूनमधून फरार

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर