“विज्ञानाचे पुस्तक आठवत नसेल पण बायकांच्या शरीराबद्दल…”, बुमराहची पत्नी चाहत्यावर भडकली

Jasprit Bumrah | भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. सध्या भारतीय संघ मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताने विजय साकारला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता बुमराह त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. कारण चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त होताना बुमराहची पत्नी संजना गणेशनने संतप्त प्रतिक्रिया दिली.

खरं तर शरीरावरून संजनाला ट्रोल करणं चाहत्याला चांगलेच भोवले. काही महिन्यांपूर्वी संजना आणि जसप्रीत एका मुलाचे आई-बाबा झाले. आताच्या घडीला कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असलेल्या बुमराहने पत्नीसोबत एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओतील संजनाचा लूक पाहून एका चाहत्याने तिला तब्येतीबद्दल प्रश्न केला.

संजना चाहत्यावर भडकली

“तू खूप जाड झाली आहेस”, चाहत्याच्या या कमेंटवर बुमराहच्या पत्नीला पारा सुटला. संजनाने प्रत्युत्तर देताना म्हटले, “शाळेतील विज्ञानाचे पुस्तक तुझ्या आठवणीत नसेल… पण बायकांच्या शरीराबद्दल कमेंट करत आहेस. चल पळ इथून”. बुमराहने 15 मार्च 2021 रोजी गोव्यात मॉडेल आणि प्रेझेंटर संजनासोबत लग्न केले. बुमराहची पत्नी माजी मिस इंडिया फायनलिस्ट आहे. या जोडप्याने 4 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचा मुलगा अंगदचे स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

 

Jasprit Bumrah चा सुपर शो

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी बुमराह कसोटी संघाचा भाग आहे. त्याने आतापर्यंत दोन कसोटीत 15 बळी घेतले आहेत आणि दुसऱ्या सामन्यात त्याच्या 9 बळींमुळे भारताला 106 धावांनी विजय मिळवता आला. कसोटी मालिकेतील तिसरा सामना 15 तारखेपासून राजकोट येथे खेळवला जाणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया मैदानात आहे.

दरम्यान, मालिकेतील पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लंडने विजयी सलामी दिली होती. पण, दुसऱ्या सामन्यात मोठा विजय मिळवत यजमान भारतीय संघाने बरोबरी साधली. उर्वरीत तीन सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. आकाश दीप या युवा खेळाडूला संधी मिळाली आहे. तर सर्फराज खान तिसऱ्या सामन्यातून पदार्पण करेल अशी शक्यता आहे.

 

उर्वरीत सामन्यांसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, लोकेश राहुल (फिटनेसवर अवलंबून), रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक ), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

News Title- ind vs eng test series Jasprit Bumrah’s wife Sanjana Ganesan hits back at troll for body-shaming her
महत्त्वाच्या बातम्या –

राज्याच्या ‘या’ भागात गारपिटीसह जोराचा पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

“केवळ एका राज्यसभेच्या भाकर तुकड्यासाठी…”; शरद पवारांच्या शिलेदारानं अशोक चव्हाणांना सुनावलं

‘…ती फक्त अफवा होती’; श्रीदेवीबाबत बोनी कपूर यांचा मोठा खुलासा

“कायम मलाच …”; Abhishek Bachchan कडून सर्वात मोठा खुलासा

“काँग्रेसने सगळं काही दिलेले नेते…”; नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर टीका