अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याचा राजीनामा

Ashok Chavan | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कांग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. चव्हाणांचा राजीनामा हा महाराष्ट्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून इथे अशोक चव्हाणांची मजबूत पकड आहे.

शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण ही एकमेव पित्रा पुत्राची जोडी आहे, ज्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. खरं तर चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आणखी काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे कळते. याबद्दल मला काहीही माहिती नसल्याने अशोक चव्हाणांनी सोमवारी सांगितले. पण, भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार, काँग्रेसला देखील राज्यात गळती लागू शकते.

राजूरकरांनीही सोडला ‘हात’

अशोक चव्हाण यांचे समर्थक माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजूरकर म्हणाले की, मी विधान परिषदेतील काँग्रेस नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदांसह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अमरनाथ राजूरकर यांनी अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यात काही काळ तेढ निर्माण झाल्याचे बोलले जाते. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार पडल्यापासूनच अशोक चव्हाण वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत होते, असे बोलले जात आहे.

 

Ashok Chavan यांचा राजीनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 80 जागा आहेत, तिथे भाजपची ताकद असून आता त्यांनी आरएलडीला सोबत घेतले आहे. अशातच महाराष्ट्रातूनही जास्तीत जास्त खासदार कसे जिंकता येतील यावर सत्ताधारी भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत अशोक चव्हाणही नाराज होते. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाने जास्त जागांवर निवडणूक लढवावी आणि राष्ट्रीय पक्ष काँग्रेसने कमी जागांवर निवडणूक लढवावी हे त्यांना मान्य नव्हते. आता ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

News Title- After Ashok Chavan, the Congress has received another shock as former MLA Amarnath Rajurkar has resigned
महत्त्वाच्या बातम्या –

“विज्ञानाचे पुस्तक आठवत नसेल पण बायकांच्या शरीराबद्दल…”, बुमराहची पत्नी चाहत्यावर भडकली

जड्डूच्या घरात कौटुंबिक कलह! सासऱ्यांबद्दल प्रश्न विचारताच आमदार रिवाबाला राग अनावर

राज्याच्या ‘या’ भागात गारपिटीसह जोराचा पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

“केवळ एका राज्यसभेच्या भाकर तुकड्यासाठी…”; शरद पवारांच्या शिलेदारानं अशोक चव्हाणांना सुनावलं

‘…ती फक्त अफवा होती’; श्रीदेवीबाबत बोनी कपूर यांचा मोठा खुलासा