“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashok Chavan | माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचा राज्यातील मोठा चेहरा अशोक चव्हाण यांनी पक्षाचा हात सोडला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशोक चव्हाणांसह इतरही काही आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना चव्हाणांनी कोणीही आपल्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केले. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली. आदर्श घोटाळ्याची भीती दाखवून अशोक चव्हाणांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाणांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

खरं तर राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत अशोक चव्हाण नाराज होते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाने जास्त जागांवर निवडणूक लढवावी आणि राष्ट्रीय पक्ष काँग्रेसने कमी जागांवर निवडणूक लढवावी हे त्यांना मान्य नव्हते. हे देखील त्यांच्या नाराजीचे प्रमुख कारण बोलले जात आहे. एकूणच राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा राज्यात येण्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर रामदास आठवले म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. अशोक चव्हाण यांनी महायुती मध्ये यावे. तसेच महायुतीमधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा असे मी त्यांना आवाहन करतो.

 

Ashok Chavan यांच्या निर्णयाने राजकीय भूकंप

दरम्यान, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. आधीच तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे आगामी काळात मतदारसंघांवरून खटके उडण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तर उघडपणे मला मतदारसंघ उरला नसल्याची खंत बोलून दाखवली.

अशोक चव्हाणांचे समर्थक माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी देखील काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजूरकर म्हणाले की, मी विधान परिषदेतील काँग्रेस नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदांसह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

News Title- Ashok Chavan should join our Republican Party, says Union Minister Ramdas Athawale
महत्त्वाच्या बातम्या –

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याने सोडला ‘हात’

“विज्ञानाचे पुस्तक आठवत नसेल पण बायकांच्या शरीराबद्दल…”, बुमराहची पत्नी चाहत्यावर भडकली

जड्डूच्या घरात कौटुंबिक कलह! सासऱ्यांबद्दल प्रश्न विचारताच आमदार रिवाबाला राग अनावर

राज्याच्या ‘या’ भागात गारपिटीसह जोराचा पाऊस, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

“केवळ एका राज्यसभेच्या भाकर तुकड्यासाठी…”; शरद पवारांच्या शिलेदारानं अशोक चव्हाणांना सुनावलं