रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election | आगामी काळात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे देशातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. राजकीय नेते मंडळींमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. अशातच केरळच्या पिनाराई विजयन सरकारने सोमवारी मोठी घोषणा केली. राज्यभरातील रेशन दुकानांवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या (NFSA) लोगोसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले साइनबोर्ड आणि फ्लेक्स-बॅनर लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करणार नसल्याचे केरळ सरकारने सांगितले.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी विधानसभेत आययूएमएलचे (Indian Union Muslim League) आमदार पी. अब्दुल हमीद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सेल्फी मोहीम हा भाजपच्या निवडणूक प्रचाराचा एक भाग आहे.

मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

पिनाराई विजयन म्हणाले की, लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा भाजपच्या प्रचाराचा एक भाग आहे. आम्ही हे निदर्शनास आणून केंद्र सरकारला कळवू की हे योग्य नाही आणि त्याची अंमलबजावणी करणे कठीण होईल. या मुद्द्यावर निवडणूक आयोगाशी संपर्क साधता येईल का याचा देखील आम्ही विचार करू.

दरम्यान, या आधी केरळचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जी.आर. अनिल म्हणाले की, केरळमधील 14,000 हून अधिक रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचा फोटो असलेले फ्लेक्स आणि बॅनर लावण्याच्या सूचना केंद्राने जारी केल्या आहेत. हे सरकारचे पाऊल योग्य नाही, या माध्यमातून केवळ प्रचार केला जात आहे.

Lok Sabha Election अन् राजकारण

तसेच केंद्र सरकारने निवडक 550 रेशन दुकानांवर पंतप्रधानांच्या फोटोसह सेल्फी पॉइंट्स बसविण्याचे निर्देश दिले आणि अधिकाऱ्यांना त्यांची तपासणी करण्यास सांगितले. त्याचा लोगो असलेल्या कॅरीबॅग वापरण्याच्या सूचनाही त्यांनी जारी केल्या आहेत. पण राज्य सरकार निवडणूक वर्षभरात अशी मोहीम राबवणार नाही, असे केरळ सरकारमधील मंत्री अनिल यांनी स्पष्ट केले.

एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना ‘अब की पार 400 पार’चा नारा दिला. सत्ताधारी भाजप 370 तर एनडीए 400 हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

News Title- Kerala government has taken a stance that Prime Minister Modi’s photos will not be placed on ration shops
महत्त्वाच्या बातम्या –

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे

“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याने सोडला ‘हात’

“विज्ञानाचे पुस्तक आठवत नसेल पण बायकांच्या शरीराबद्दल…”, बुमराहची पत्नी चाहत्यावर भडकली

जड्डूच्या घरात कौटुंबिक कलह! सासऱ्यांबद्दल प्रश्न विचारताच आमदार रिवाबाला राग अनावर