इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताची ‘कसोटी’! स्टार खेळाडू बाहेर, नव्या चेहऱ्याला संधी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs ENG 3rd Test | भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघ विराट कोहलीच्या अनुपस्थित ही मालिका खेळत आहे. सलामीच्या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांना काही साजेशी कामगिरी करता आली नव्हती. अशातच खेळाडूंच्या दुखापतीने कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढवली आहे.

लोकेश राहुल बाहेर

राजकोट कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. कारण लोकेश राहुल तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. हैदराबाद कसोटीत राहुलला दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो एनसीएमध्ये होता. विशाखापट्टणम कसोटीत तो खेळू शकला नसला तरी राजकोट कसोटीत तो खेळू शकतो, अशा बातम्या आल्या होत्या. मात्र फिटनेस चाचणीनंतर राहुलला राजकोट येथे होणाऱ्या कसोटीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

राहुल संघाबाहेर झाल्यानंतर आता आणखी एका युवा खेळाडूला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. हा डावखुरा फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 8 पैकी 5 सामन्यात शतके झळकावण्याची किमया साधली आहे.

IND vs ENG 3rd Test गुरूवारपासून थरार

दरम्यान, राजकोटची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असली तरी राहुलच्या अनुपस्थितीमुळे संघाची अडचण वाढली आहे. विराट कोहली राजकोट कसोटी सामन्यातून पुनरागमन करेल असे मानले जात होते पण आता तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. आता राहुलच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाची मधली फळी खूपच अननुभवी झाली आहे.

श्रेयस अय्यर देखील अखेरच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघाचा भाग नाही. मधल्या फळीत रजत पाटीदार आणि सर्फराज खानसारखे खेळाडू आहेत. इतकेच नाही तर यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेललाही राजकोटमध्ये संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सर्फराज आणि ध्रुवला पदार्पणाची संधी मिळते का हे पाहण्याजोगे असेल.

 

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक ), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

News Title- IND vs ENG 3rd Test kl rahul ruled out and Devdutt Padikkal named replacement
महत्त्वाच्या बातम्या –

रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचे फोटो लावले जाणार नाहीत; मुख्यमंत्र्यांची आक्रमक भूमिका

भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवले तर तो शहिदांचा अपमान ठरेल – उद्धव ठाकरे

“अशोक चव्हाण यांनी आमच्या पक्षात यावं”, केंद्रीय राज्यमंत्र्यांची खुली ऑफर

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला अजून एक धक्का; आणखी एका नेत्याने सोडला ‘हात’

“विज्ञानाचे पुस्तक आठवत नसेल पण बायकांच्या शरीराबद्दल…”, बुमराहची पत्नी चाहत्यावर भडकली